Join Our WhatsApp Group

PCB : संपूर्ण पाकिस्तान क्रिकेट संघाचा पगार विराट कोहलीच्या पगारा एवढा आहे ?

PCB : बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड मानले जाते. BCCI भारतीय खेळाडूंना पगार म्हणून मोठी रक्कम देते. मात्र, जगात असे अनेक क्रिकेट बोर्ड आहेत जे आपल्या खेळाडूंना खूप कमी मानधन देतात, त्यामुळे बोर्ड आणि खेळाडूंमध्ये नेहमीच वाद होत असतात.

या क्रिकेट बोर्डांमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही समावेश आहे. तथापि, पीसीबीने 2023 च्या विश्वचषकापूर्वी खेळाडूंच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा पगार संपूर्ण पाकिस्तान संघाइतका आहे.

Rohit Sharma : ‘मला फक्त या गोलंदाजाची भीती वाटते..’, विश्वचषकापूर्वी कर्णधार रोहितचा खुलासा.

PCB दरवर्षी एवढा पैसा आपल्या खेळाडूंवर खर्च करते.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंवर वर्षाला 7 कोटी रुपये खर्च करतो. बोर्ड खेळाडूंना चार ग्रेडमध्ये ठेवते आणि त्यानुसार वेतन देते. दुसरीकडे, विराट कोहलीला बीसीसीआयकडून वार्षिक 7 कोटी रुपये मानधन मिळते. कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहसह कोहलीचा A+ श्रेणीमध्ये समावेश आहे.

  • ग्रेड A : बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह आफ्रिदी (पाकिस्तान 13 लाख रुपये)
  • ग्रेड B : फखर जमान, हरिस रौफ, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, नसीम शाह आणि शादाब खान
  • ग्रेड C : इमाद वसीम और अब्दुल्ला शफीक
  • ग्रेड D : फहीम अश्रफ, हसन अली, इफ्तिखार अहमद, इहसानुल्लाह, मोहम्मद हरीस, मोहम्मद वसीम जूनियर, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सईद शकील, शाहनवाज डहानी, शान मसूद, उसामा मीर आणि जमान खान.

विराट कोहली हा जगातील सर्वाधिक मानधन घेणारा क्रिकेटपटू आहे

विराट कोहली हा जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. बीसीसीआयच्या पगाराव्यतिरिक्त, त्याचे उत्पन्न आयपीएल, जाहिराती आणि सोशल मीडियामधून देखील होते.

टीम इंडियाच्या खेळाडूंचा पगार

ICC ने वर्ल्डकप पूर्वी बदलला सर्वात मोठा नियम. सामना टाय झाला तर हा संघ विजयी घोषित करणार.

  • A+ ग्रेड (7 कोटी रुपये) – रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना A+ ग्रेड आहे.
  • A ग्रेड (5 कोटी रुपये) – हार्दिक पांड्या, आर अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ पंत आणि अक्षर पटेल.
  • B ग्रेड (3 कोटी रुपये)- चेतेश्वर पुजार, केएल राहलु, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल.
  • C ग्रेड (1 कोटी रुपये)- उमेश यादव, शिखर धवन, शार्दुल ठाकुर, ईशान किशन, दीपक हुड्डा, युजवेन्द्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, संजू सैमसन, अर्शदीप सिंह आणि केएस भरत.

14 ऑक्टोबरला विश्वचषक 2023 मध्ये हाय व्होल्टेज सामना

आयसीसी विश्वचषक 2023 चा हाय व्होल्टेज सामना 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दिवशी भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने येतील. 7 वर्षांनंतर दोन्ही संघ भारतात आमनेसामने येतील ही मोठी गोष्ट आहे. सामन्यापूर्वी हैदराबादमध्ये जेवणाचा आणि पाहुणचाराचा आनंद पाकिस्तान क्रिकेटपटू घेत आहेत.