Join Our WhatsApp Group

World Cup 2023 संपताच हा दिग्गज कोहलीसह निवृत्ती जाहीर करणार, बीसीसीआयच्या पोस्टमुळे खळबळ

World Cup 2023 : टीम इंडिया सध्या वर्ल्ड कप 2023 च्या तयारीत व्यस्त आहे. 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटचे हे महायुद्ध भारतात सुरू होणार आहे. ही स्पर्धा भारतासाठी अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा 10 वर्षांचा प्रदीर्घ दुष्काळ संपवण्याची संधी मिळणार आहे.

ही स्पर्धा संपताच अनेक भारतीय चाहत्यांना धक्के बसणार आहेत. कारण या स्पर्धेनंतर अनेक खेळाडू निवृत्त होऊ शकतात. या संदर्भात, बीसीसीआयने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यानंतर असे दिसते आहे की विश्वचषक 2023 संपताच हा दिग्गज विराट कोहलीसह क्रिकेटला रामराम करेल.

World Cup 2023 : टीम इंडिया फक्त एक सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश करणार. भारतासाठी खुशखबर

World Cup 2023 नंतर हे दोन दिग्गज टीम इंडियाला धक्का देऊ शकतात

टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन यांना संघाला 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन बनवायचे आहे. याआधी कोहली आणि अश्विन विश्वचषक 2015 संघाचा भाग होते. पण त्या वर्षी संघाला विजेतेपद मिळवण्यात यश मिळू शकले नाही.

2011 मध्ये हे दोघेही विश्वचषकात संघात होते. त्या वर्षी टीम इंडिया चॅम्पियन झाली. कोहली आणि अश्विन हे दोनच खेळाडू 2011 च्या विश्वचषकानंतर 2023 च्या विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत.

बीसीसीआयने ही पोस्ट शेअर केली

या अंतर्गत बीसीसीआयने या दोन खेळाडूंसाठी एक अप्रतिम पोस्टर शेअर केली आहे, ज्यामध्ये विराट कोहली आणि आर अश्विन वर्ष 2011 च्या जर्सीत दिसत आहेत. यानंतर दोघेही वर्ल्ड कप 2023 च्या जर्सीत दिसत आहेत.

या मेगा इव्हेंटनंतर अनेक ज्येष्ठ खेळाडू निवृत्त होणार असल्याची जोरदार चर्चा क्रिकेटच्या कॉरिडॉरमध्ये आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि आर अश्विन यांची नावे प्रमुख आहेत. असे मानले जात आहे कि कोहली नोव्हेंबरमध्ये 35 वर्षांचा होईल आणि अश्विन 37 वर्षांचा आहे. रोहित शर्मा सध्या 36 वर्षांचा आहे, त्यामुळे वयामुळे हे खेळाडू निवृत्त होणार आहे.

ICC ने वर्ल्डकप पूर्वी बदलला सर्वात मोठा नियम. सामना टाय झाला तर हा संघ विजयी घोषित करणार.

विराट आणि अश्विनला 2023 चा वर्ल्ड कप जिंकायचा आहे

विराट कोहली 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा टीम इंडियाकडून खेळला होता. यानंतर कोहली 2015 आणि 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही खेळताना दिसला होता. आता विराट कोहलीचा हा चौथा विश्वचषक असेल.

त्याचबरोबर फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचा हा तिसरा विश्वचषक असेल. अशा परिस्थितीत या दोघांना 2023 चा विश्वचषक जिंकून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळवायचे आहे.