Join Our WhatsApp Group

Babar Azam च्या भावाने पाकिस्तान संघाची इज्जत वेशीला टांगली. म्हणाला यांना खूप अहंकार आहे.

Babar Azam : कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने मोठ्या अपेक्षेने विश्वचषकात प्रवेश केला होता. पाकिस्तानने सलग दोन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली. त्यानंतर पाकिस्तानला तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. ही स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरलेला पाकिस्तान संघ आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.

याबाबत पाकिस्तान क्रिकेट संघाचे चाहते बाबर आझमवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, बाबरच्या भावाने केलेल्या वक्तव्य चर्चेत आले आहे.

SMAT : सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये धवनची बॅट चमकली. 127 धावा ठोकून BCCI ला दाखवला आरसा

Babar Azam च्या चुलत भावाने केले वक्तव्य

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे क्रिकेट चाहते निराश झाले आहेत. या पराभवानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावर सातत्याने टीका होत आहे. यात माजी यष्टिरक्षक फलंदाज आणि बाबरचा चुलत भाऊ कामरान अकमलचाही समावेश आहे. कामरान अकमलने लाइव्ह शोमध्ये पाकिस्तान संघाबद्दल आश्चर्यकारक विधान केले आहे.

कामरान अकमल म्हणतो की संघाने सर्व सामने हरले पाहिजेत

ARY न्यूजवरील लाईव्ह शोमध्ये कामरान अकमलने हे वक्तव्य केले आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाबद्दल बोलताना तो म्हणाला, “जर पाकिस्तानचे क्रिकेट सुधारायचे असेल तर संघाने जास्त सामने जिंकू नयेत आणि टॉप 4 मध्येही पोहोचू नये.”

यावर अँकर म्हणाला, तुम्हाला पाकिस्तान जिंकताना बघायचे नाही का? त्याला उत्तर देताना कामरान म्हणाला,

“मला त्यांना जिंकलेले पाहायचे आहे, पण पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी संघ हरला आणि आणखी बदल केले तर बरे होईल. कारण संघ जिंकला तर त्यांना पुन्हा त्याच परिस्थितीचा सामना करावा लागेल.”

अकमलच्या मते संघ सुधारू शकतो

यानंतर अँकरने कामरान अकमलला थांबवले आणि सांगितले की बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ टूर्नामेंट हरताना पाहू शकत नाही. यावर अकमलने उत्तर दिले की, मी हे मॅच हरण्यासाठी नाही तर त्यांचा अहंकार कमी करण्यासाठी बोललो होतो. पाकिस्तानसाठी 53 कसोटी, 157 एकदिवसीय आणि 58 टी-20 सामने खेळलेल्या कामरान अकमलच्या मते, पाकिस्तान क्रिकेटमध्ये सुधारणा होऊ शकते.

IPL 2024 च्या लिलावाची तारीख जाहीर, जगातली सर्वात मोठी लीग भारतात नाही तर या ठिकाणी होणार.

बाबर आझमला सलग तीन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले

दरम्यान, बाबर आझम पाकिस्तान संघाने विश्वचषकात चांगली सुरुवात केली. संघाने पहिल्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, पुढच्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर संघाला अफगाणिस्तानविरुद्ध अत्यंत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.