Join Our WhatsApp Group

AUS vs PAK : बंगळुरूमध्ये पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी फटकारले, व्हिडिओ व्हायरल

AUS vs PAK : ICC विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यात सामना क्रमांक 18 खेळला गेला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या.

याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानचे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरले. या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक विचित्र घटना घडली. वास्तविक, सुरक्षेच्या कारणास्तव तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी एका पाकिस्तानी चाहत्याला त्याच्या देशाच्या घोषणा देण्यापासून रोखले. त्याचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

भारतीय कर्णधारावर 3.85 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप. Team India साठी खेळलेत 400 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने

AUS vs PAK : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यापासून थांबवले

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) विश्वचषक 2023 मध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी आले. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाने पूर्ण ताकद लावली. प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चौकार आणि षटकार मारून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी संघानेही चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाला पोलिसांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यापासून रोखल्याने स्टेडियमचे वातावरण थोडेसे बिघडले. त्या प्रेक्षकाने पाकिस्तानची जर्सी घातली होती. मात्र, ती व्यक्ती पाकिस्तानची नागरिक आहे की भारताची रहिवासी आहे, याची पुष्टी होऊ शकली नाही.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रंजक वळणावर आहे.

बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर ICC विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) संघ एकमेकांशी भिडले. टॉस जिंकून कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

MI : नीता अंबानींनी खेळला मोठा सट्टा, IPL 2024 साठी या बलाढ्य खेळाडूवर कोट्यवधी रुपये गुंतवले.

कांगारू सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (163) आणि मिचेल मार्श (121) यांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानसाठी त्यांचे दोन्ही सलामीवीर इमाम उल हक (70) आणि अब्दुल्ला शफीक (64) यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. मात्र एवढे करून पण पाकिस्तान संघ शेवटी 62 धावांनी पराभूत झाला.

बघा व्हिडीओ