Join Our WhatsApp Group

Hardik Pandya गंभीर प्रकृतीत रुग्णालयात दाखल, आता वर्ल्डकपसह इतके महिने टीम इंडियातून बाहेर

Hardik Pandya : टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 च्या पहिल्या चार सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रोहित आणि कंपनीने चारही सामने जिंकून गुणतालिकेत आपले स्थान अव्वल ठेवले आहे. भारताच्या या यशात अष्टपैलू आणि संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याचा मोठा वाटा होता. त्याने सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळ केला.

मात्र गुरुवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला दुखापत झाली. यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. मात्र, रविवारी भारताला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार असून त्याआधी हार्दिक पांड्याबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे.

Virat Kohli च्या खास मित्राने अचानक घेतली निवृत्ती… क्रिकेट विश्वात उडाली खळबळ.

Hardik Pandya रुग्णालयात दाखल

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात स्वतःच्याच गोलंदाजीवर चौकार रोखताना त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. वास्तविक, डावातील हे 9 वे षटक होते, जे हार्दिक पांड्या टाकत होता. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने समोरच्या दिशेने जोरदार शॉट खेळला, जो थांबवण्यासाठी हार्दिकने उजवा पाय पुढे केला.

यावेळी त्याच्या डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली आणि तो जमिनीवर पडला. टीम इंडियाचा फिजिओ लगेच मैदानात आला आणि त्याच्या पायाला टेप लावला आणि काही उपचार करण्याचाही प्रयत्न केला, पण हार्दिक खेळण्याच्या स्थितीत नव्हता. यानंतर पांड्याला मैदान सोडावे लागले.

दुखापतीनंतर हार्दिक पांड्याला मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांकडे स्कॅनसाठी पाठवण्यात आले होते. त्याला स्टेडियममधून रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. तो व्हिडिओ तुम्ही खाली बघू शकता

हार्दिक पांड्या किती काळ संघाबाहेर राहणार ?

पाठीच्या दुखापतीमुळे हार्दिक आधीच टीम इंडियातून बराच काळ बाहेर होता. अशा स्थितीत पुन्हा एकदा हार्दिकला दीर्घकाळ क्रिकेटचे मैदान सोडावे लागू शकते, अशी भीती चाहत्यांना लागली आहे. मात्र, आता बीसीसीआयने याबाबत अधिकृत निवेदन जारी करून चाहत्यांची चिंता दूर केली आहे.

AUS vs PAK : बंगळुरूमध्ये पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्या प्रेक्षकांना पोलिसांनी फटकारले, व्हिडिओ व्हायरल

बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पांड्याला केवळ न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी सामन्यासाठी बाहेर ठेवण्यात येणार आहे. यानंतर तो इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संघात सामील होईल. मात्र, किवी संघाविरुद्ध तो संघाचा भाग नसेल हा टीम इंडियासाठी मोठा धक्का आहे.