Join Our WhatsApp Group

MI : नीता अंबानींनी खेळला मोठा सट्टा, IPL 2024 साठी या बलाढ्य खेळाडूवर कोट्यवधी रुपये गुंतवले.

MI : सध्या क्रिकेट चाहते भारतात खेळल्या जाणार्‍या विश्वचषक 2023 मध्ये व्यस्त आहेत, दरम्यान, IPL 2024 संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. 5 वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने आपल्या फ्रँचायझीमध्ये अनुभवी खेळाडूचा समावेश केला आहे.

हा खेळाडू राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीमध्ये मागील 2 हंगामात सहभागी होता. आता पुन्हा एकदा दिग्गज क्रिकेटर मुंबई इंडियन्सला आपल्या अनुभवाचे बाळ कडू पाजताना दिसणार आहे.

IPL 2024 : मुंबईने सोडले हे 4 खेळाडू तर बंगळुरूने या 7 खेळाडूंना सोडले.

हा खेळाडू MI मध्ये सामील झाला

मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबईला 4 वेळा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा खेळाडू गेल्या 2 हंगामात राजस्थान रॉयल्सच्या फ्रँचायझीच्या सेवेत होता. तो खेळाडू दुसरा कोणी नसून श्रीलंकेचा महान वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आहे.

आयपीएल 2019 नंतर मलिंगा आयपीएलमधून निवृत्त झाला, त्यानंतर तो 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील झाला. आता तो आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. आयपीएल 2024 मध्ये तो मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

लसिथ मलिंगाची आयपीएल कारकीर्द

श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची आयपीएल कारकीर्द अतिशय चमकदार आहे. त्याच्या खेळण्याच्या कारकिर्दीत तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सला 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याचे मोठे योगदान आहे. त्याने 122 आयपीएल सामन्यांच्या 122 डावात गोलंदाजी करताना 170 विकेट्स घेतल्या आहेत.

David Warner ने पाकिस्तानच्या गोलंदाजांना फोडून काढले. बनवला असा रेकॉर्ड कि विराट-रोहित स्वप्नातही हा विक्रम मोडू शकत नाहीत

या कालावधीत त्याने 6 वेळा एका डावात 4 विकेट्स आणि एकदा 5 विकेट्स घेण्यात यश मिळविले आहे. त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 13 धावांत 5 बळी. आता मलिंगा निवृत्त झाल्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना तयार करताना दिसणार आहे.