Join Our WhatsApp Group

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर Cheteshwar Pujara परदेशात या देशासाठी खेळणार….

Cheteshwar Pujara : अनुभवी भारतीय खेळाडू चेतेश्वर पुजाराला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी देण्यात आली नाही, बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी हे मान्य केले आहे की आता चेतेश्वर पुजारा भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला आहे.

35 वर्षीय अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये शेवटचा सामना खेळला होता, त्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळाली नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संधी न मिळाल्याने भारताचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराने इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

मुस्लीम असल्याचा मला अभिमान आहे, मला नमाज अदा करायची असेल तर कोण अडवणार ? Mohammed Shami

Cheteshwar Pujara भारत सोडून इंग्लंडला रवाना

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा पुजारा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणार आहे. तो सलग तिसऱ्या मोसमात ससेक्स क्लबकडून खेळताना दिसणार आहे. चेतेश्वर पुजाराने 2024 च्या काउंटी हंगामासाठी इंग्लंडच्या काउंटी क्रिकेट क्लब ससेक्सशी पुन्हा करार केला आहे. तो 2022 मध्ये पहिल्यांदा ससेक्समध्ये दाखल झाला. हा स्टार फलंदाज 2024 च्या हंगामातील काउंटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या 7 सामन्यांसाठी उपलब्ध असेल.

Cheteshwar Pujara ससेक्ससाठी सतत धावा करत आहे.

भारताचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराने ससेक्समध्ये सामील झाल्यानंतर शतक झळकावले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या अनुभवी भारतीय खेळाडूने सांगितले की,

MS Dhoni ची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

ससेक्ससाठी पुजाराची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या क्लबसाठी, त्याने काउंटी चॅम्पियनशिपच्या 18 सामन्यांमध्ये 64.24 च्या सरासरीने 1863 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 8 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने पहिल्या सत्रात डर्बीशायरविरुद्ध केलेल्या 231 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आता चेतेश्वर पुजाराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आतापर्यंत भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले आहेत आणि 19 शतकांच्या मदतीने एकूण 7195 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 3 वेळा द्विशतके झळकावली आहेत.