Join Our WhatsApp Group

MS Dhoni वर फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला मद्रास उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली.

MS Dhoni : क्रिकेटच्या इतिहासात अशी अनेक कृत्ये घडली आहेत, ज्यांनी दिग्गज खेळाडूंच्या करियरला कलंकित केले आहे. त्यापैकी एक म्हणजे आयपीएल 2013 दरम्यान घडलेले मॅच फिक्सिंग प्रकरण. यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या एस श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तीन खेळाडूंचा समावेश होता. तिघांनाही तुरुंगवासाची शिक्षा होऊन गेली आहे.

या घटनेत चेन्नई सुपर किंग्जचे सदस्य गुरुनाथ मयप्पन यांचाही सहभाग होता. त्याचबरोबर संघाचा कर्णधार एमएस धोनीला सुद्धा अनेक प्रश्नोत्तरे विचारण्यात आली. त्यादरम्यान, तामिळनाडूचे IPS अधिकारी संपत कुमार यांनी आयपीएल मधील सट्टेबाजी घोटाळ्यात धोनीच्या सहभागाबद्दल बोलले होते. त्या प्रकरणी हायकोर्टाने मोठी कारवाई केली आहे.

मुस्लीम असल्याचा मला अभिमान आहे, मला नमाज अदा करायची असेल तर कोण अडवणार ? Mohammed Shami

MS Dhoni ला फिक्सर म्हणणाऱ्यांवर मोठी कारवाई

आयपीएल 2013 मॅच फिक्सिंग दरम्यान, तामिळनाडूचे आयपीएस अधिकारी संपत कुमार यांनी एमएस धोनीवर या घटनेत सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. याचा निषेध म्हणून, धोनीने संपत कुमारसह प्रतिवादींना या प्रकरणाशी संबंधित त्याच्याविरुद्ध बदनामीकारक विधाने जारी करण्यापासून किंवा प्रकाशित करण्यापासून रोखण्यासाठी उच्च न्यायालयाकडे आदेश मागितला होता.

आता त्याच संदर्भात, 15 डिसेंबर 2023 रोजी मद्रास उच्च न्यायालयाने धोनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेत IPS अधिकारी संपत कुमार यांना 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कुमारला अपील दाखल करण्याची परवानगी देण्यासाठी न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या खंडपीठाने 30 दिवसांसाठी शिक्षेला स्थगिती दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर Cheteshwar Pujara परदेशात या देशासाठी खेळणार….

बीसीसीआयने MS Dhoni चा गौरव केला

टीम इंडियामध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महान क्रिकेटपटू एमएस धोनीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अनोखा सन्मान दिला आहे. वास्तविक त्याची जर्सी क्रमांक-7 बीसीसीआयने निवृत्त केली आहे. धोनीच्या सन्मानाखातीर बीसीसीआयने हे केले आहे. नुकतीच राष्ट्रीय संघात समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना याबाबत माहिती देण्यात आली आहे. याआधी हा सन्मान फक्त सचिन तेंडुलकरला मिळाला आहे.