Join Our WhatsApp Group

मुंबई इंडियन्स सोडून केकेआरमध्ये जाणार Rohit Sharma.. स्वत: वक्तव्य करून खळबळ उडवून दिली

Rohit Sharma : इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) चा 17 वा हंगाम एप्रिलमध्ये खेळवला जाईल. ज्यासाठी सर्व फ्रँचायझी पूर्णपणे तयार आहेत. या मोसमापूर्वी 5 वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले आहे.

त्याच्या जागी IPL 2024 साठी हार्दिक पांड्याला नवा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यानंतर हिटमॅनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याने प्रतिक्रिया देत मोठा खुलासा केला आहे.

मुस्लीम असल्याचा मला अभिमान आहे, मला नमाज अदा करायची असेल तर कोण अडवणार ? Mohammed Shami

IPL 2024 पूर्वी Rohit Sharma ने मौन तोडले

रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. रोहित 2013 पासून मुंबईचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. पण 2024 च्या 17 व्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्स संघाने रोहितला कर्णधारपदावरून हटवले आणि हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवले. दरम्यान, रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

महिला अँकरने मुलाखतीत रोहित शर्माला एक प्रश्न विचारला, “तुला आयपीएलमधील कोणत्या संघाचा कर्णधार व्हायला आवडेल का”. या प्रश्नाचे उत्तर रोहितने अगदी सहज आणि हसतमुखाने दिले,

MS Dhoni वर फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला मद्रास उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली.

“मला कोलकाता ईडन गार्डनचे मैदान खूप आवडते, त्यामुळे मला केकेआरचा कर्णधार व्हायला आवडेल”. मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराने केकेआरला इशारा दिला की भविष्यात संधी मिळाल्यास तो या संघाची कमान सांभाळू शकतो.

बघा व्हिडीओ

Rohit Sharma दक्षिण आफ्रिकेला रवाना

एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर प्रथमच भारतीय कर्णधार रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळताना दिसणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर रोजी सेंच्युरियन येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय कर्णधार मुंबई विमानतळावरून दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे.