Join Our WhatsApp Group

MS Dhoni ची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त, बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय

MS Dhoni : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीची 7 क्रमांकाची जर्सी यापुढे कोणत्याही खेळाडूला दिली जाणार नाही. बीसीसीआयने मोठा निर्णय घेत धोनीचा जर्सी नंबर रिटायर करण्याचा निर्णय घेतला आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तीन वर्षांनी, बीसीसीआयने त्याच्या खेळातील योगदानाबद्दल आदरांजली म्हणून विश्वचषक विजेत्या कर्णधाराने परिधान केलेला नंबर ‘रिटायर’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Deepak Chahar ची कारकीर्द उध्वस्त करणार 18 वर्षांचा हा प्राणघातक गोलंदाज. त्याने आशिया कपमध्ये एकामागून एक 7 फलंदाजांचा बळी घेतला.

MS Dhoni हा दुसरा खेळाडू

याआधी हा सन्मान मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आहे. 2017 मध्ये, बीसीसीआयने त्याच्या 10 क्रमांकाची जर्सी कायमची निवृत्त करण्याचा निर्णय घेतला होता.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने राष्ट्रीय संघातील खेळाडूंना, विशेषत: पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना सांगितले आहे की, त्यांच्याकडे तेंडुलकर आणि धोनीशी संबंधित क्रमांकाचा पर्याय नाही, आता ते या क्रमांकाची जर्सी घालू शकणार नाहीत.

image 8

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “युवा खेळाडू आणि सध्याच्या भारतीय संघातील खेळाडूंना एमएस धोनीची 7 क्रमांकाची जर्सी उपलब्ध होणार नाही असे सांगितले आहे. धोनीच्या खेळातील योगदानाबद्दल बीसीसीआयने त्याची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन खेळाडूला 7 वा क्रमांक मिळू शकत नाही आणि 10 क्रमांक आधीच उपलब्ध क्रमांकांच्या यादीतून बाहेर होता.”

IND vs ENG : W,W,W,W,W डी. वाय पाटील स्टेडियम वर दीप्ती शर्मा नावाचं वादळ. अवघ्या 7 धावा देऊन..

MS Dhoni ची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

एमएस धोनी हा भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी-20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर, धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने 2011 एकदिवसीय विश्वचषक जिंकला, ज्याच्या अंतिम सामन्यात धोनीला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

यानंतर 2013 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. त्यानंतर भारताला आयसीसीचे एकही विजेतेपद जिंकता आलेले नाही. धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 90 कसोटी, 350 एकदिवसीय आणि 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

यामध्ये त्याने अनुक्रमे 4876, 10773 आणि 1617 धावा केल्या. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्धचा विश्वचषक उपांत्य सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता.