Join Our WhatsApp Group

टीम इंडियाला मोठा झटका, Mohammed Shami नंतर आता हा भारतीय खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर.

Mohammed Shami : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोहम्मद शमीला वगळण्यात आल्याची माहिती दिली होती.

त्याचवेळी आता टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाच्या या बलाढ्य खेळाडूने कसोटी मालिकेतून आपले नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे बीसीसीआयला संघात बदल करावे लागले.

Rahul Dravid ने या खेळाडूची कारकीर्द उध्वस्त करण्याची जणू शपथ घेतलीये. 3 वर्षांपासून टीम इंडियाचा टुरिस्ट

Mohammed Shami नंतर हा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

वास्तविक, काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चाहत्यांना कळवले होते की टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. यानंतर पुन्हा एकदा भारतावर संकटांचा डोंगर कोसळला आहे.

युवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने वैयक्तिक कारण सांगून मालिकेतून माघार घेतली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही बातमी दिली. यासोबतच बीसीसीआयने इशान किशनच्या बदलीची घोषणा केली आहे.

या खेळाडूची एंट्री

बीसीसीआयने इशान किशनच्या जागी निवड जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेसोबत खेळल्या जाणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी केएस भरतने अचानक टीम इंडियात प्रवेश केला आहे. तब्बल सहा महिन्यांनंतर तो संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

MS Dhoni वर फिक्सिंगचा आरोप करणाऱ्या IPS अधिकाऱ्याला मद्रास उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली.

यासोबतच भारताला 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळायचा आहे, तर दोन्ही संघ 2 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात आमनेसामने असतील. यामध्ये टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. मात्र, मोहम्मद शमीनंतर इशान किशन हे मालिकेतून बाहेर असणे संघासाठी चांगली बातमी नाही.

भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक).