Join Our WhatsApp Group

LIVE पत्रकार परिषदेत Suryakumar Yadav ने उडवली महिला पत्रकाराची खिल्ली,व्हिडिओ व्हायरल

Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलियाला 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 4-1 ने पराभूत करून टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. आता दुसरा टी-20 सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल.

यासाठी संपूर्ण टीम जोरदार तयारी करत आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत आहे.

IND Vs SA : 84 कसोटी खेळलेल्या या सलामीच्या फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा, हि मालिका त्याची शेवटची असेल.

Suryakumar Yadav झाला ट्रोल

12 डिसेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसाठी पोहोचला होता. पत्रकार परिषद संपल्यावर एका महिला पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला. सुर्याने पत्रकाराला गुड मॉर्निग म्हणून शुभेच्छा दिल्या पण प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी हसतच तो कॉन्फरन्समधून निघून गेला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यानंतर त्याच्यावर टीका होत आहे.

Suryakumar Yadav

दक्षिण आफ्रिकेत विजय मिळेल का?

ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेत पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाची कमान सोपवण्यात आली होती. या बलाढ्य संघाविरुद्ध सूर्याने केवळ कर्णधारच नाही तर उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कामगिरीच्या जोरावर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 फॉरमॅटचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. या मालिकेत तो संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो का, हे पाहणे बाकी आहे.

IPL 2024 पूर्वी KKR संघाचा मालक शाहरुख खानच्या अडचणी वाढल्या, कायदेशीर नोटीस मिळाल्यामुळे कठोर कारवाई.

हार्दिकसाठी धोका

ऑस्ट्रेलिया पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादव यशस्वी ठरला, तर तो हार्दिक पांड्यासाठी धोका ठरू शकतो. फिटनेसच्या समस्येचा सामना करत असलेल्या हार्दिकच्या जागी सूर्याला T20 चा कायमस्वरूपी कर्णधार बनवले जाऊ शकते.

टी-20 संघातील भक्कम स्थान आणि भक्कम फलंदाजीच्या जोरावर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. तथापि, हा निर्णय 2024 च्या T20 विश्वचषकानंतरच घेतला जाईल कारण पुढील T20 विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा संघाचा कर्णधार असेल.

बघा व्हिडीओ