Join Our WhatsApp Group

SA Vs IND : सूर्यकुमार यादवच्या या एका मूर्खपणामुळे दक्षिण आफ्रिकेने भारताचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला.

SA Vs IND : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 19.3 षटकांत 180 धावा केल्या. ज्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने 56 धावा आणि रिंकू सिंगने 68 धावांची खेळी खेळली. 19 व्या ओव्हर दरम्यान पाऊस सुरू झाला ज्यामुळे 3 चेंडू शिल्लक असताना सामना थांबवावा लागला.

पावसामुळे दुसऱ्या डावाचा खेळ लांबला. त्यामुळे सामना 15 षटकांचा करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेला 152 धावांचे आव्हान मिळाले. दुसऱ्या डावात या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. यासह दक्षिण आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

IND Vs SA : 84 कसोटी खेळलेल्या या सलामीच्या फलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा, हि मालिका त्याची शेवटची असेल.

SA vs IND : दक्षिण आफ्रिकेने भारताचा पराभव केला

दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात DLS नियमांच्या आधारे 90 चेंडूत 150 धावांचे लक्ष्य मिळाले. डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या मॅथ्यू ब्रिट्झके आणि रीझा हेंड्रिक्स यांनी मात्र आफ्रिकेला आक्रमक सुरुवात करून दिली. मॅथ्यू ब्रेट्झके 7 चेंडूत 14 धावा काढून धावबाद झाला.

पण त्याच्या बाद झाल्याने फारसा फरक पडला नाही. कारण कर्णधार एडन मार्करामने मैदानावर उतरताच ताबडतोब फलंदाजी सुरु केली. पॉवर प्लेच्या 5 षटकांत मार्कराम आणि हेंड्रिक्स यांनी 67 धावा केल्या. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करत आफ्रिकेला विजयाच्या जवळ नेले. रीझा हेंड्रिक्सने 27 चेंडूंत 49 धावांची खेळी केली. तर एडन मार्करामने 30 धावांचे योगदान दिले. सरतेशेवटी, मिलर आणि स्टॅव्हस यांनी उर्वरित काम पूर्ण केले.

सर्यकुमार यादवच्या चुकीमुळे भारताचा पराभव

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग-11 निवडताना मोठी चूक केली. सूर्याने उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या टी-20 चा नंबर-1 फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला संधी दिली नाही. त्याने शेवटच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध घातक गोलंदाजी केली होती. बिश्नोईने या मालिकेत 9 विकेट घेतल्या होत्या. आफ्रिकेविरुद्ध सूर्याने त्याचा समावेश केला असता तर भारत हा सामना जिंकू शकला असता.

LIVE पत्रकार परिषदेत Suryakumar Yadav ने उडवली महिला पत्रकाराची खिल्ली,व्हिडिओ व्हायरल

रिंकू सिंगने पहिले टी-20 अर्धशतक झळकावले

SA Vs IND rinku singh first t20 fifty

रिंकू सिंगने आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. रिंकूने आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यापूर्वी अनेकवेळा तो आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. या सामन्यात रिंकूने 59 चेंडूत 68 धावा केल्या.

डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल या सलामीवीरांना खाते न उघडताच बाद व्हावे लागले. तिलक वर्माने 29 धावांची खेळी खेळली. कर्णधार सूर्यकुमार यादवने 56 आणि जडेजाने 19 धावांचे योगदान दिले.