Join Our WhatsApp Group

“मला Babar Azam आवडतो मी त्याला फॉलो करतो…”, शुभमन गिलने IND vs PAK सामन्यापूर्वी केले मोठे विधान

Babar Azam : रविवारी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिलने पाकिस्तान टीमचा कॅप्टन बाबर आझम आणि पाकिस्तानच्या बॉलिंग डिपार्टमेंटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

शुभमन गिलचे मत आहे की भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजीचा फारसा सामना केला नाही, त्यामुळे ते त्यांच्याविरुद्ध संघर्ष करताना दिसतात. याशिवाय त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचे वर्णन वर्ल्ड क्लास खेळाडू म्हणून केले आहे. मी बाबर आझम कडून शिकण्याचा प्रयत्न करतो, असेही त्याने म्हटले आहे.

IND vs PAK : राखीव दिवशीही भारत-पाकिस्तान सामना रद्द झाला तर हा संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार.

Babar Azam चे शुभमन गिल ने केले कौतुक

आयोजित पत्रकार परिषदेत शुभमन गिल म्हणाला, “बाबर आझम हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. आम्ही त्याची फलंदाजी पाहायचो आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी तो काय करतो हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचो. होय, मी त्याचा चाहता आहे. “

याशिवाय तो पाकिस्तानी गोलंदाजांबद्दल म्हणाला की, “जेव्हा तुम्ही या स्तरावर खेळत असाल, जिथे इतर संघांच्या तुलनेत पाकिस्तानशी कमी क्रिकेट खेळले आहे. त्यांच्याकडे दर्जेदार गोलंदाजी आक्रमण आहे. जेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या बॉलिंगचा सामना करण्याची सवय नसते तेव्हा फरक पडतो.”

सलामीच्या जोडीबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली

शुभमन गिल पुढे म्हणाला कि, “रोहित एक असा व्यक्ती आहे ज्याला गोलंदाजांचा सामना करणे आवडते. आम्ही एकमेकांना सपोर्ट करतो. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फलंदाज असल्यामुळे विरोधी संघासाठी ते कठीण होऊ शकते.

Ajit Agarkar : बेन स्टोक्स सारखी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूचे करियर बरबाद करतोय अजित आगरकर

रोहित एरियल शॉट्स खेळतो, तर मी ग्राउंड शॉट्स खेळतो. त्यामुळे आम्हा दोघांना सलामीवीर म्हणून रोखणे विरोधी संघाला कठीण जाते. एकदिवसीय सामन्यातील संभाव्य धावसंख्येबद्दल शुबमन गिल पुढे म्हणाला,

“एकदिवसीय फॉर्मेटमध्ये मानसिकतेमध्ये गोंधळ आहे असे नाही, सलामीवीर म्हणून आम्ही फक्त सामन्याची परिस्थिती पाहतो आणि खेळपट्टीची मागणी काय आहे त्या हिशोबाने खेळतो. काही मैदानांवर 350 पुरेसे नाहीत, तर काही मैदानांवर 250 ही चांगली धावसंख्या असू शकते.