Join Our WhatsApp Group

Shubman Gill : प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे शुभमन गिल हॉस्पिटल मध्ये भरती. आता पाकिस्तान विरुद्ध…

Shubman Gill : भारताचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल डेंग्यूने ग्रस्त आहे . अशातच एक नवीन आणि अस्वस्थ करणारी बातमी समोर येत आहे. गिलला चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातूनही तो बाहेर पडू शकतो.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, गिलच्या प्लेटलेट्समध्ये काही काळापासून घट होत आहे. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो टीम इंडियासोबत दिल्लीला गेला नाही. भारतीय संघाचा पुढील सामना अफगाणिस्तान विरुद्ध आहे, हा सामना दिल्लीत होणार आहे.

पाकिस्तानी महिला पत्रकाराने हिंदू देवी-देवतांचा अपमान केल्याच्या तक्रारीनंतर घाबरून भारतातून पळ काढला

यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. या सामन्यापूर्वी गिलसाठी ही बातमी चांगली नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

प्लेटलेटचे प्रमाण कमी असल्यास प्रवास न करण्याचा वैद्यकीय सल्ला संघ व्यवस्थापनाला देण्यात आला होता. याआधी बीसीसीआयने सोमवारीच एक निवेदन जारी केले होते की, शुभमन गिल अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत होणारा सामना खेळणार नाही.

विश्वचषकापूर्वी गिलबद्दल बरीच चर्चा झाली होती. त्याच्या बॅटमधून खूप धावा अपेक्षित होत्या पण त्याआधीच त्याला डेंग्यूने घेरले. जर तो पाकिस्तानविरुद्धही खेळला नाही तर त्याचे तीन सामने न खेळता जातील. तो कधी फिट होईल आणि कधी मैदानात परतेल हे सध्या सांगता येणार नाही.

IND Vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याबाबत दहशतवादी धमकी. गुजरात पोलिसांची उडाली झोप

त्याचे न खेळणे हा भारतासाठी निश्चितच मोठा धक्का आहे. यंदा तो दमदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन सलामीवीर म्हणून संघात खेळत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध किशन खाते न उघडताच बाद झाला. आगामी सामन्यांमध्ये त्याची कामगिरी चांगली राहील अशी आशा क्रिकेट प्रेमी आणि संघ व्यवस्थापन करत आहे.