Join Our WhatsApp Group

PCB : ‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 5 महिन्यांपासून पगार नाही…’ माजी खेळाडूने PCB चा पर्दाफाश केला.

PCB : विश्वचषक 2023 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघासोबत काहीही चांगले घडत नाहीये. या स्पर्धेत नेदरलँड आणि श्रीलंकेला पराभूत करून शानदार सुरुवात करणाऱ्या पाकिस्तान संघासाठी भारताकडून झालेल्या पराभवानंतर काहीही चांगले घडले नाही.

आधी भारता पुढे संघ हरला, नंतर ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि आता दक्षिण आफ्रिकेनेही पाकिस्तानला पराभूत केले. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. बातमीनुसार, पाकिस्तानी खेळाडूंना गेल्या 5 महिन्यांपासून पगार मिळाला नाहीये.

MS Dhoni ने केला मोठा खुलासा, स्क्रिप्ट नुसार खेळले गेले IPL 2023 फायनल ?

PCB ने पाकिस्तानी खेळाडूंना पगार दिला नाही

विश्वचषक 2023 मध्ये, शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान (SA vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्यात पाकिस्तान क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटर राशिद लतीफने एका टीव्ही शोमध्ये बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. रशीद लतीफ यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान क्रिकेट संघातील खेळाडूंना गेल्या 5 महिन्यांपासून वेतन दिले गेले नाही.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 2 दिवसांपासून बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मेसेज करत आहे मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नाही. रशीद लतीफ यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघ वर्ल्ड कपमधून जवळपास बाहेर

विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सलग पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ या स्पर्धेच्या पुढील टप्प्यातून जवळपास बाहेर पडला आहे. आता पुढच्या टप्प्यात जाण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील.

IND vs AUS T20 : ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 नंतर भारताविरुद्ध T20I मालिका खेळणार, या खेळाडूकडे कर्णधारपद

त्यानंतर संघाला अनेक समीकरणांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. पाकिस्तानला अजूनही न्यूझीलंड, बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्ध सामने खेळायचे आहेत.

सर्व सामने जिंकण्याबरोबरच इतर संघांच्या सामन्यातील निर्णय आपल्या बाजूने लागली पाहिजे , अशी आशा त्यांना करावी लागेल. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघासाठी या विश्वचषकात मैदानावर आणि मैदानाबाहेर काहीही चांगले घडत नाहीये.

बघा व्हिडीओ