Join Our WhatsApp Group

Harmanpreet Kaur ने मिशेल स्टार्कच्या पत्नीला रागाच्या भरात बॉल मारला, शिवीगाळ केली, व्हिडिओ व्हायरल

Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा तापट स्वभाव सर्वांनाच ठाऊक आहे. क्रिकेटच्या मैदानावर ती अनेकदा विरोधी संघातील खेळाडूंशी भांडताना दिसते. पंच असो की खेळाडू, प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर कसे द्यायचे हे हरमनप्रीत कौरला माहीत आहे.

त्याचवेळी पुन्हा एकदा हरमनप्रीत कौर विरोधी संघातील खेळाडूसोबत भांडताना दिसली. हरमनप्रीत कौरचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भयानक गोलंदाज मिचेल स्टार्कच्या पत्नीसोबत वाद झाला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rohit Sharma ला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात महेंद्रसिंग धोनीचा हात

Harmanpreet Kaur ची मिचेल स्टार्कच्या पत्नीशी भांडण

21 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळाला. दरम्यान, दोन्ही संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एलिसा हेली यांच्यात भांडणे झाली.

खरे तर असे झाले की ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या डावातील 80 व्या षटकात हरमनप्रीत कौर गोलंदाजी करायला आली. यावेळी एलिसा हेली 28 धावा करून फलंदाजी करत होती. भारतीय कर्णधाराने चेंडू टाकला, त्यावर मिचेल स्टार्कची पत्नी अ‍ॅलिसा हिली पुढे आली आणि बचावात्मक शॉट खेळला. अशा स्थितीत गोलंदाजाने चेंडू उचलला आणि तो थेट फलंदाजाच्या दिशेने फेकला.

MS Dhoni च्या बेस्ट फ्रेंडने दिला धोका. चेन्नई सुपर किंग्ज सोडून IPL 2024 साठी या संघात सामील.

या कारणावरून भांडणे झाली

हरमनप्रीत कौरने टाकलेल्या थ्रोनंतर चेंडू हेलीच्या बॅटला लागून सीमापार गेला आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या चार धावा झाल्या. अशा स्थितीत हरमनप्रीत कौरला राग आला आणि ती हेलीसोबत वाद घालताना दिसली.

बघा व्हिडीओ

पंचांचे असे म्हणणे होते कि फलंदाजाने स्वत:ला वाचवण्यासाठी चेंडू रोखला होता. त्यामुळे तो ऑब्स्ट्रटिंग द फील्ड आउट देऊ शकत नाही. मात्र, पुढच्याच चेंडूवर हरमनप्रीत कौरने एलिसा हेलीला एलबीडब्ल्यू आऊट करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले.