Join Our WhatsApp Group

Rohit Sharma ला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यात महेंद्रसिंग धोनीचा हात

Rohit Sharma : रोहित शर्माची नुकतीच मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून, त्याच्या जागी गुजरात टायटन्सकडून ट्रेड झाल्यानंतर भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

हार्दिक पांड्या कर्णधार झाल्यानंतर चाहत्यांची चांगलीच निराशा झाली होती. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सच्या फॉलोअर्सची संख्या कमी होऊ लागली आणि काही वेळातच लाखो चाहत्यांनी मुंबईला अनफॉलो केले आणि मुंबई संघाच्या मॅनेजमेंटवर खूप टीका केली. दरम्यान, रोहित शर्माचे कर्णधारपद जाण्यामागे काही चाहते एमएस धोनीशी संबंध जोडत आहेत.

MS Dhoni च्या बेस्ट फ्रेंडने दिला धोका. चेन्नई सुपर किंग्ज सोडून IPL 2024 साठी या संघात सामील.

Rohit Sharma ला कर्णधारपदावरून हटवण्याचा डाव कोणाचा?

टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरून हटवले असून, त्याच्या जागी हार्दिक पांड्या आता मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माचे कर्णधारपद गमावण्यामागे हार्दिक पांड्यासोबत एमएस धोनीचाही हात असल्याचे चाहत्यांना वाटते.

हार्दिक पांड्या आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यांच्यात चांगले संबंध असल्याचे चाहत्यांचे मत आहे. आयपीएल 2023 दरम्यानही हार्दिक पांड्या धोनीचे खूप कौतुक करत होता.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीमध्ये युवा खेळाडू स्टार खेळाडू बनतात, असेही त्याने निवेदनात म्हटले होते. हार्दिक आणि धोनीची ही मैत्री पाहून लोक म्हणत आहेत की, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यात एमएस धोनीचाही हात असू शकतो.

IPL 2024 : ना धावा, ना विकेट, तरीही आयपीएलमध्ये दरवर्षी करोडो रुपयांना विकला जातो हा भारतीय खेळाडू

नेमके सत्य काय आहे ?

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागे एमएस धोनीशी संबंध असल्याच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या वाटतात. महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक यांच्यात नक्कीच चांगली मैत्री आहे पण रोहित शर्माचे कर्णधारपद गमावण्यात त्याची कोणतीही भूमिका असू शकत नाही.

हार्दिक पांड्या गुजरातमधून ट्रेड झाल्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याला कर्णधार म्हणून घोषित केले. रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यामागे कोणत्याच खेळाडूचे षडयंत्र असल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.