Join Our WhatsApp Group

2011 World Cup जिंकण्याचे श्रेय एकट्या धोनीला का ? युवी सचिनकडे दुर्लक्ष का ? गौतम गंभीर

2011 World Cup : 2011 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने तब्बल 28 वर्षांनंतर ट्रॉफीवर कब्जा केला. त्या संपूर्ण स्पर्धेदरम्यान, अनुभवी अष्टपैलू युवराज सिंगने अप्रतिम कामगिरी केली होती, ज्यामुळे तो टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता.

त्याचवेळी स्वतः कर्णधार महेंद्रसिंग धोनीने 91 धावांची धडाकेबाज खेळी खेळताना नुवान कुलसेकराच्या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकून ट्रॉफी मिळवली. त्या सामन्यात शानदार फलंदाजी करताना गौतम गंभीरनेही 97 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून विजयाचा पाया रचला. मात्र, शेवटपर्यंत थांबून संघाला विजय मिळवून दिल्याबद्दल एमएस धोनीला सामनावीराचा किताब मिळाला.

हे वाचा : Asia Cup 2023 सुरू होण्यापूर्वीच या खेळाडूला कोर्टाची नोटीस. 2023 च्या वर्ल्डकप मधून बाहेर

2011 World Cup मध्ये हे खेळाडू देखील महत्वाचे

सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, सुरेश रैना, मुनाफ पटेल यांच्यासह इतर खेळाडूंनीही ही स्पर्धा जिंकण्यात अमूल्य योगदान दिले. पण टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ज्या पद्धतीने सामना संपवला याचे सर्वाधिक श्रेय महेंद्रसिंग धोनीला दिले जाते.

2011 च्या विश्वचषकाबाबत अनेक वेळा प्रसारमाध्यमांमधील चर्चा केवळ एमएस धोनीभोवतीच फिरत असते. त्यामुळे भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने नाराजी व्यक्त केली आहे.

RevSportz ला दिलेल्या मुलाखतीत माजी अनुभवी फलंदाज गौतम गंभीर म्हणाला, “आम्ही 2011 च्या विश्वचषकासाठी युवराज सिंगला पुरेसे श्रेय दिले नाही. झहीर, रैना, मुनाफला देखील कोणी श्रेय दिले नाही.

हे वाचा : KL Rahul आणि Shreyas Iyer ला घेऊन तुम्हाला हरायचं आहे का ? Kapil Dev यांचे वक्तव्य.

सचिन हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, पण आपण त्याच्याबद्दल बोलतो का? मीडिया फक्त महेंद्रसिंग धोनीच्या एका सिक्सबद्दल बोलते. तुम्हाला एका व्यक्तीचे वेड आहे परंतु तुम्ही संघाला विसरलात.

2011 च्या विश्वचषक स्पर्धेचा हिरो ठरलेल्या युवराज सिंगने 9 सामन्यात गोलंदाज म्हणून एकूण 15 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने 362 धावाही केल्या. तर झहीर खान २१ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.

तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकूण 9 सामन्यात 482 धावा केल्या आहेत. जे विश्वचषक 2011 मध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंमध्ये सर्वाधिक होते.