Join Our WhatsApp Group

BCCI अधिकाऱ्यांवर IND vs SA सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

BCCI : ईडन गार्डन्स स्टेडियमवर 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप BCCI आणि CAB अधिकाऱ्यांसह ऑनलाइन तिकीट बुकिंग पोर्टल BookMyShow वर करण्यात आला आहे.

याबाबत एका क्रिकेटप्रेमीने कोलकाता येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे पोलिसांनी गुरुवारी कॅब आणि बुकमायशोच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

Sachin Tendulkar च्या सल्ल्याने एमएस धोनीला बनवले टीम इंडियाचा कर्णधार, BCCI सचिव जय शाह यांनी केला मोठा खुलासा.

BCCI वर तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) च्या अधिका-यांनी बुकमायशो या ऑनलाइन तिकीट बुकिंग पोर्टलसह भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याचा आरोप आहे.

5 नोव्हेंबरला ईडन गार्डन्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगणार आहे.याबाबत एका क्रिकेटप्रेमीने कोलकाता येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, कॅब आणि बुकमायशोच्या अधिकाऱ्यांना तिकीट विक्रीच्या पद्धतीबाबत विचारणा करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Rishabh Pant या मालिकेतून टीम इंडियात परतणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी खुश खबर

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याची तिकिटे कुठे गेली हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला जाईल. तिकिटे सर्वसामान्यांना बाजारात का उपलब्ध होत नाहीत? विशेष म्हणजे या सामन्याबाबत कोलकात्यात प्रचंड उत्साह आहे, मात्र या सामन्याची तिकिटे कुठेच मिळत नसल्याने लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

सीएबीशी संलग्न असलेल्या अनेक क्लबनेही तिकीट न मिळाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. कोलकातामध्ये सध्या भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मंगळवारी आणि बुधवारी तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी पोलिसांनी काहींना अटक केली आहे. त्यांच्याकडून अनुक्रमे 20 आणि 16 तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.