Join Our WhatsApp Group

VIDEO : आधी कर्णधारपदाचा राजीनामा, नंतर बॅटला गंज लागली, आता Babar Azam सिपंल कॅच सुद्धा पकडत नाहीये. हे पाहून गोलंदाजही संतापला.

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तानला न्यूझीलंडसोबत पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने 46 धावांनी गमावला होता. या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन केले.

पण पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या सामन्यात बाबरने अतिशय सोपा झेल सोडला. यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होत असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

Ajinkya Rahane ने रणजी ट्रॉफीमध्येही कापले नाक, केले असे काम की…

Babar Azam ने सोपा झेल सोडला

सामन्याच्या पाचव्या षटकात ही घटना घडली. अब्बास आफ्रिदीने लेग स्टंपवर स्लोअर फुल बॉल टाकून केन विल्यमसनला फसवले. विल्यमसनला हुक शॉट खेळायचा होता आणि बाबर लाँग-ऑनला उभा होता. मात्र, कॅच पकडण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू त्याच्या हातातून निसटून सीमारेषेजवळ पडला.

विल्यमसनला जीवदान देण्यात फक्त बाबर एकटा नव्हता. संघाचा अष्टपैलू खेळाडू इफ्तिखार अहमदनेही थर्ड मॅनवर त्याचा झेल सोडला. दोन जीवदान मिळाल्यानंतर विल्यमसनने 42 चेंडूत 57 धावांची खेळी केली. विल्यमसनला दोनदा जीवनदान देणे नंतर पाकिस्तानला महागात पडले.

RCB ला मोठा झटका, IPL 2024 पूर्वी Virat Kohli ने या कारणामुळे सोडला संघ…!

बघा व्हिडीओ

सामन्याची परिस्थिती

पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच चेंडूवर शाहीनने डेव्हॉन कॉनवेला बाद केले. यानंतर फिन ऍलनने काही शानदार फटके खेळले. यानंतर डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांच्यात चांगली भागीदारी झाली.

न्यूझीलंडने 20 षटकात 226 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली पण सॅम अयुब धावबाद झाल्यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्यामुळे भागीदारी होऊ शकली नाही. पाकिस्तानकडून बाबर आझमने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावा केल्या. टीम सौदीने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक चार विकेट घेतल्या.