Join Our WhatsApp Group

SRH : काव्या मारन कडून ब्रायन लाराची हाकालपट्टी. आरसीबीच्या माजी कर्णधाराला दिली जबाबदारी

SRH : इंडियन प्रीमियर लीगची 16 वी आवृत्ती सनरायझर्स हैदराबाद (SRH) साठी चांगली गेली नाही. ते प्लेऑफमध्येही पोहोचू शकले नाहीत आणि त्यांना लीग स्टेजमधून बाहेर पडावे लागले. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, 14 सामन्यांत हैदराबाद (SRH) संघ केवळ 4 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला.

त्याचवेळी त्यांना 10 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. 8 गुणांसह, सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. दरम्यान, या फ्रँचायझीने पुढील वर्षासाठी तयारी केली आहे. त्यांनी आज आपल्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.

हे वाचा : Rinku Singh : डेब्यूच्या आधीच रिंकू सिंगचे करिअर उद्ध्वस्त. 20 वर्षीय खेळाडूने हिसकावून घेतली जागा.

आयपीएल 16 मधील सर्वात खराब संघ

SRH संघाने IPL च्या 16 व्या सीजन मध्ये खूपच लाजिरवाणी खेळी केली. प्लेऑफ गाठण्यापासून ते गुणतालिकेत सर्वात खराब संघ असल्याचे सिद्ध झाले. या संघाला 14 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले.

या आवृत्तीपूर्वी झालेल्या मिनी लिलावात त्यांनी 13.35 कोटींची मोठी किंमत मोजून इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकचा संघात समावेश केला होता. त्यामुळे संघाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. ब्रूकने 11 सामन्यांत केवळ 190 धावा केल्या ज्यात एका शतकाचा समावेश आहे.

हे वाचा : Nicholas Pooran : तिसऱ्या सामन्यापूर्वी निकोलस पूरनवर मोठी कारवाई, तिसरा सामना खेळण्यावर बंदी ?

SRH ने या अनुभवी खेळाडूला प्रशिक्षक बनवले

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील आवृत्तीसाठी सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने आधीच तयारी सुरू केली आहे. वास्तविक संघ व्यवस्थापनाने पुढील हंगामापूर्वी संघाचे प्रशिक्षक बदलले आहेत. न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू डॅनियल व्हिटोरी आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) चे प्रशिक्षक असतील.

ब्रायन लारा हा या वर्षी संघात असताना त्याचा करार संपुष्टात आला. लारा 2 वर्षांपासून या संघाशी संबंधित आहे. त्याचवेळी, व्हिटोरी (डॅनियल व्हिटोरी) सध्या ऑस्ट्रेलियन संघाशी संबंधित आहे.