Join Our WhatsApp Group

‘मी आता ठरवलंय..’ विश्वचषक फायनलमधील पराभवानंतर Rohit Sharma ने तोडलं मौन. बघा व्हिडीओ

Rohit Sharma : आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाची कामगिरी उत्कृष्ट होती. रोहित आणि कंपनीने ग्रुप स्टेजमधील सर्व 9 सामने जिंकले आणि सर्व छोट्या मोठ्या संघांना पराभूत केले. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून, त्यांनी सलग 10 वा सामना जिंकला आणि अभिमानाने अंतिम फेरीत स्थान निश्चित केले.

टीम इंडियाचा फॉर्म पाहून यावेळेस यजमान भारतच विजेतेपद मिळवेल, असा विश्वास सगळ्यांना वाटत होता. पण तसे झाले नाही, अंतिम फेरीत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध हृदयद्रावक पराभवाला सामोरे जावे लागले. जवळपास एक महिन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने या जेतेपदाच्या पराभवावर आपले मौन तोडले आहे.

मॅच न खेळता आगरकरचा हा आवडता खेळाडू रात्रंदिवस पार्ट्या करतो. BCCI च्या पैशावर सतत नशेत असतो

‘पराजय स्वीकारणे सोपे नाही’ – Rohit Sharma

भारताचा कर्णधार रोहित शर्मा म्हणतो की विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीतील पराभव स्वीकारणे खूप कठीण होते. या गोष्टी मनातून काढायचा खूप प्रयत्न केला. यामध्ये त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनीही त्याला साथ दिली. रोहितच्या सोशल मीडिया टीमने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो,

“फायनलनंतर, परत येणे आणि पुढे जाणे खूप कठीण होते, म्हणूनच मी ठरवले की मला मनातून या गोष्टी काढून टाकायला हव्यात. पण नंतर मला जाणवले की लोक माझ्याकडे येत आहेत आणि ते आमच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत कि आम्ही किती चांगले खेळलो. मला हे सर्व समजतय. हे भारतीय फॅन्स आमच्यासोबत विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहत होते.”

Rohit Sharma चे स्वप्न 50 षटकांचा विश्वचषक जिंकण्याचे आहे

रोहित शर्माने सांगितले की, तो लहानपणापासून 50 षटकांचा विश्वचषक पाहत आहे आणि तो जिंकणे हे त्याचे स्वप्न आहे. तो म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर ते अवघड होते आणि पुढे जाणे इतके सोपे नव्हते. मी 50 षटकांचा विश्वचषक पाहत मोठा झालो आहे. माझ्यासाठी हे खूप मोठे बक्षीस होते. आम्ही एवढी वर्षे केवळ विश्वचषकासाठी काम केले आहे. आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर हि बाब खूप निराशाजनक आहे.”

इंग्लंडचा हा म्हातारा खेळाडू भारताविरुद्ध कसोटी सामना खेळणार, Virat Kohli शी वर्षानुवर्षे त्याचे वैर आहे.

रोहितने चाहत्यांचे आभार मानले

रोहित शर्माने चाहत्यांचे आभार मानताना सांगितले की, “या संपूर्ण काळात आम्ही जिथे गेलो तिथे आम्हाला लोकांचा खूप पाठिंबा मिळाला. जे स्टेडियममध्ये आले त्यांच्याकडून आणि जे आम्हाला त्यांच्या घरातून पाहत होते त्यांच्याकडून. त्या दीड महिन्यात लोकांनी आमच्यासाठी काय केले याचे मला कौतुक करायचे आहे. “पण मग, मी विश्वचषक गमावल्या बद्दल जितका जास्त विचार करतो तितकाच मी निराश होतो.”

बघा व्हिडीओ