Join Our WhatsApp Group

Video : भारत विश्वचषक जिंकावा म्हणून Rishabh Pant चार धामच्या प्रवासाला निघाला, भोलेनाथला नवस केला.

Rishabh Pant : टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी 30 डिसेंबरला झालेल्या भीषण रस्ता अपघातातून तो अजूनही सावरलेला नाहीये. भारतीय संघाला त्याची कमी जाणवत आहे.

पंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल, आशिया कप 2023, वर्ल्ड कप 2023 सारख्या मोठ्या स्पर्धांमधून बाहेर आहे. रिपोर्टनुसार तो पुढील वर्षी होणाऱ्या इंग्लंड कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो. दरम्यान, तो खेळापासून दूर राहून ईश्वराच्या सानिध्यात आश्रय घेणार आहे. वास्तविक तो केदारनाथ आणि बद्रीनाथला रवाना झाला आहे.

Ravindra Jadeja ची कारकीर्द संपवायला आला रोहित शर्माचा नातेवाईक, बॉलिंग सोबत बॅटिंगने सुद्धा कहर करतो.

Rishabh Pant केदारनाथ आणि बद्रीनाथला पोहोचला

ऋषभ पंतसाठी गेला काही काळ चांगला राहिलेला नाही. गेल्या वर्षी रुरकी येथे झालेल्या अपघाताने त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर ठेवले. मात्र, आता तो बराचसा सावरला आहे. काल त्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये ऋषभ पंत सराव सामन्यादरम्यान चौकार आणि षटकार मारत होता.

दरम्यान, पंत केदारनाथ आणि बद्रीनाथला गेला आहे. वास्तविक, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता ज्यामध्ये तो सहस्त्रधारा डेहराडून येथे हेलिकॉप्टरमध्ये बसला आणि केदारनाथला रवाना झाला. खानपूरचे आमदार उमेश कुमारही त्याच्यासोबत दिसले.

या मालिकेतून ऋषभ पंत पुनरागमन करणार आहे

World Cup 2023 संपताच हा दिग्गज कोहलीसह निवृत्ती जाहीर करणार, बीसीसीआयच्या पोस्टमुळे खळबळ

ऋषभ पंत फार कमी वेळात टीम इंडियासाठी सामना विजेता म्हणून उदयास आला. त्याने महेंद्रसिंग धोनीची उणीव जाणवू दिली नाही. पंतने तिन्ही फॉरमॅटमध्ये महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली.

मात्र, गेल्या वर्षी एका कार अपघाताने त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लावला. सध्या तो दुखापतीतून सावरत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत पुढील वर्षी 2024 मध्ये इंग्लंडसोबतच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो.

बघा व्हिडीओ