Join Our WhatsApp Group

“मला IPL खेळायचे आहे..” या पाकिस्तानी खेळाडूने आयपीएल मध्ये खेळण्याची ईच्छा व्यक्ती केली.

IPL : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात महागडी आणि लोकप्रिय लीग आहे. या लीगचा भाग बनणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. कुठल्याही देशाचा खेळाडू असो त्याला IPL मध्ये एकदा तरी भाग घेण्याची इच्छा होते.

IPL म्हणजे अफाट संपत्ती, स्टैंडर्ड क्रिकेट आणि खेळाडूंना भेटण्याची आणि ड्रेसिंग रुम शेयर करण्याची संधी. ज्याचे प्रत्येकजण क्रिकेटर आणि चाहते म्हणून स्वप्न पाहतो. यामुळेच आजपर्यंत आयपीएल न खेळलेल्या खतरनाक गोलंदाजाने या लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Suresh Raina ने घेतला निवृत्तीतून यू-टर्न. IPL 2024 पूर्वी या फ्रँचायझीमध्ये सामील.

मला IPL मध्ये खेळायचे आहे

जगभरातील सर्व मोठे क्रिकेटपटू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतात परंतु पाकिस्तानचा एकही खेळाडू या लीगचा भाग नाही. मात्र, पाकिस्तानी क्रिकेटपटूंना दरवर्षी भारतात येऊन आयपीएल खेळायचे असते.

पाकिस्तानचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज हसन अलीनेही अलीकडेच एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, ‘आयपीएल ही जगातील सर्वोत्तम टी-20 लीग आहे. भविष्यात मला या लीगचा भाग बनण्याची संधी मिळाली तर मला नक्कीच या लीगचा भाग व्हायला आवडेल.

15 वर्षांपासून आयपीएलचा भाग नाही

आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. पहिल्या सत्रात या लीगमध्ये पाकिस्तानचे अनेक मोठे खेळाडू सहभागी झाले होते. पण नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईतील ताज आणि ओबेरॉय हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी पकडल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रवेशावर बंदी घातली होती.

ऑस्ट्रेलिया सिरीज दरम्यान Rohit Sharma चा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय ? चाहत्यांना धक्का

विश्वचषकात चांगली कामगिरी

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी झाली होती पण आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या हसन अलीने चांगली कामगिरी केली होती. नसीम शाहच्या दुखापतीमुळे विश्वचषक संघात स्थान मिळवलेल्या 29 वर्षीय हसन अलीने 6 सामन्यात 9 विकेट घेतल्या.

या गोलंदाजाने 22 कसोटीत 78 विकेट्स, 66 एकदिवसीय सामन्यांमध्ये 100 बळी आणि 50 टी-20 सामन्यांमध्ये 60 बळी घेतले आहेत. 2017 मध्ये भारताचा पराभव करून पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. हसन त्या स्पर्धेतील मालिकावीर ठरला.