Join Our WhatsApp Group

PAK vs AFG : अफगाणिस्तानने केला पाकिस्तानचा कचरा. 8 गडी राखून मिळवला दणदणीत विजय.

PAK vs AFG : 23 ऑक्टोबर रोजी ICC एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ एकमेकांशी भिडले. एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये चकमक झाली. नाणेफेक जिंकल्यानंतर बाबर आझमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला.

बाबर आझम अब्दुल्ला शफीकच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने 282 धावा धावफलकावर लावल्या. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तान संघ धावा करण्यात यशस्वी झाला.

IPL 2024 पूर्वी MI ला मोठा धक्का, मुंबई इंडियन्सचा दिग्गज राजस्थान संघात सामील

PAK vs AFG: बाबर आझमने अर्धशतकी खेळी खेळली

पाकिस्तान (PAK vs AFG) सलामीवीर अब्दुल्ला शफीकने अर्धशतक झळकावून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने 75 चेंडूत 58 धावा केल्या. या खेळीत त्याच्या बॅटमधून पाच चौकार आणि दोन षटकार आले.

त्याच्याशिवाय कर्णधार बाबर आझमनेही अर्धशतक झळकावले. त्याने 92 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 74 धावांची तुफानी खेळी खेळली. अब्दुल्ला शफीकने बाबर आझम आणि इमाम उल हकसोबत अनुक्रमे 54 आणि 56 धावांची भागीदारी केली.

हे दोघे बाद झाल्यानंतर इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी जबाबदारी स्वीकारली. या दोघांनी संयुक्तपणे संघासाठी 73 धावा केल्या. इफ्तिखार अहमद आणि शादाब खान यांनी 40-40 धावांची खेळी केली. अफगाणिस्तानकडून नूर अहमदने तीन आणि नवीन उल हकने दोन गडी बाद केले. मोहम्मद नबी आणि अजमतुल्ला उमरझाई यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

‘ही भारताच्या इतिहासातील सर्वात फालतू निवड समिती आहे…’, Gautam Gambhir ने मुख्य निवडकर्त्यावर केला हल्ला बोल.

पाकिस्तानने दिलेल्या 283 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाने चांगली सुरुवात केली. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी झंझावाती खेळी करत संघासाठी शतकी भागीदारी केली.

दोन्ही खेळाडूंनी मिळून 128 चेंडूत 130 धावा केल्या. यामध्ये इब्राहिम झद्रानने 62 धावांचे योगदान दिले, तर रहमानउल्ला गुरबाज 65 धावा करून शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर बाद झाला. तो पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर रहमत शाह आणि इब्राहिम जादराण दोंघानी मिळून खेळ पुढे नेला.