Join Our WhatsApp Group

Naseem Shah च्या 2 पावले पुढे त्याचाच छोटा भाऊ, लवकरच भारताची ठासायला येणार.

Naseem Shah : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे ICC एकदिवसीय विश्वचषक 2023 चा भाग होऊ शकला नाही. आशिया चषक 2023 दरम्यान त्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला विश्वचषक संघात स्थान मिळू शकले नाही.

नसीम शाह दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे, तर त्याचा धाकटा भाऊ पाकिस्तानच्या भूमीवर आपले गोलंदाजी कौशल्य दाखवत आहे. देशांतर्गत स्पर्धेत त्याने फलंदाजांची बोलती बंद केली आहे. त्याच्या गोलंदाजीचा पराक्रम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mohammad Rizwan वर मैदानावर नमाज अदा केल्यामुळे कडक कारवाई. पाकिस्तानला मोठा झटका

Naseem Shah पेक्षा छोटा भाऊ दोन पावले पुढे

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने अनेक फलंदाजांना आपले बळी बनवले आहे. नसीम शाहने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजीत पदार्पण केले आहे, तर त्याचा धाकटा भाऊ हुसेन शाह याने Quaid E Azam Trophy 2023 मध्ये चमक दाखवली आहे.

ताशी 140 किमी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या या गोलंदाजाने 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. खरेतर, सोमवारी कराची रीजन व्हाईट आणि लाहोर रीजन ब्लूज यांच्यातील संघर्षात हुनैन शाहने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. तो लवकरच पाकिस्तान संघाचा भाग होऊन भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करेल अशी पाकिस्तान क्रिकेट प्रेमींना आशा आहे.

नसीम शाहला आशिया कपमध्ये दुखापत झाली होती

विशेष म्हणजे हुसेन शाह केवळ 19 वर्षांचा आहे. इतक्या लहान वयात त्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांच्या मनात भीती निर्माण केली आहे. आशिया कप 2023 मध्ये भारतासोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात नसीम शाहला दुखापत झाली होती. पण तो अजून तंदुरुस्त होऊ शकला नाही आणि त्यामुळे त्याला 2023 च्या विश्वचषकातून बाहेर पडावे लागले.

हे खेळाडू वर्ल्ड कप मध्ये फक्त पाणी पाजायला आणि हमाली करायला आलेत. Rohit Sharma ने एकही संधी दिली नाही.

नसीम शाहच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 14 एकदिवसीय सामन्यात 32 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 17 कसोटी सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 51 विकेट आहेत. नसीम शाहच्या अनुपस्थितीत हसन अलीचा संघात समावेश करण्यात आला आहे.

बघा व्हिडीओ