Join Our WhatsApp Group

MS Dhoni च्या टीमने तोडला RCB आणि MI चा अभिमान, ट्रॉफीनंतर आता या बाबतीत रचला इतिहास

MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने आतापर्यंत एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली एकूण 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. दरवर्षी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये नवनवीन विक्रम रचत असतात. आयपीएल 2023 मध्ये, चेन्नईने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून ट्रॉफी जिंकली.

या विजयात रवींद्र जडेजाचे मोलाचे योगदान होते, त्यानंतर संघाचा कर्णधार एमएस धोनीने त्याला उचलून घेतले. त्याच वेळी, आता CSK च्या फ्रँचायझीने IPL 2024 च्या आधी एक नवीन कामगिरी आपल्या नावावर केली आहे.

हे वाचा : Rishabh Pant अपघातानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना दिसला, खेळले आक्रमक फटके

अशी कामगिरी करणारा MS Dhoni हा पहिला संघ ठरला

वास्तविक, CSK ने एक नवा विक्रम रचला आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर 10 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. सीएसके हा या बाबतीत आयपीएलचा पहिला संघ ठरला आहे.

चाहत्यांच्या बाबतीत चेन्नई सुरुवातीपासूनच अव्वल आहे. रैना, जडेजा आणि धोनीसारखे मोठे खेळाडू फ्रँचायझीच्या चाहत्यांचा मुख्य आधार आहेत. मित्रांनो CSK नंतर RCB आणि MI चे फॅन फॉलोइंग सर्वाधिक आहे.

मुंबई इंडियन्स CSK ला टक्कर देत आहे

विशेष म्हणजे, ट्विटरवर इतर फ्रँचायझींचे फॅन फॉलोविंग देखील जबरदस्त आहे. 8.2 दशलक्ष फॉलोअर्ससह, पाच वेळा ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लोकप्रिय संघ आहे.

तर, विराट कोहलीचा आरसीबी 6.8 दशलक्ष फॉलोअर्ससह तिसरा सर्वात लोकप्रिय संघ आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR), ज्याने दोनदा IPL ट्रॉफी जिंकली आहे, 5.2 दशलक्ष फॉलोअर्ससह IPL मधील चौथ्या क्रमांकाची प्रसिद्ध फ्रँचायझी आहे.

CSK पाचव्यांदा चॅम्पियन

हे वाचा : “लायकीत राहा नाही तर…”, Ravindra Jadeja च्या पत्नीने महिलेला दिली धमकी, VIDEO झाला व्हायरल

एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएलच्या यशस्वी संघांपैकी एक आहे. 2023 मध्ये संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 29 मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात CSK ने गुजरात टायटन्सचा पराभव करून ट्रॉफी जिंकली.

चेन्नईने 2010 मध्ये पहिले विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2011, 2018 आणि 2021 मध्ये संघ चॅम्पियन बनला. मात्र, आतापर्यंत केवळ एमएस धोनीच चेन्नई सुपर किंग्जला ट्रॉफी मिळवून देऊ शकला आहे.