Join Our WhatsApp Group

हा पाकिस्तानी फलंदाज Virat Kohli चा 50 शतकांचा विक्रम मोडणार…कामरान अकमल

Virat Kohli : विराट कोहलीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावल्यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीचा हा विक्रम मोडण्याची क्षमता आमच्या या पाकिस्तानी खेळाडू मध्ये आहे, असे कामरान अकमलचे मत आहे.

पाकिस्तान न्यूज चॅनल एआरवायशी बोलताना कामरान अकमल म्हणाला की, जगातील अव्वल तीन फलंदाज आहेत जे 50 वनडे शतके पूर्ण करू शकतात. यामध्ये बाबर आझम याचेही नाव आहे. या यादीत माजी पाकिस्तानी खेळाडूने शुभमन गिलचे नावही जोडले.

“Mohammed Shami ने बॉल खिशात ठेवून” माजी पाकिस्तानी खेळाडूचे शमी बद्दल वादग्रस्त विधान.

Virat Kohli बद्दल अकमलने केले मोठे वक्तव्य

अकमल म्हणाला, 50 शतकांचा तो विक्रम फक्त टॉप-3 फलंदाजच मोडू शकतात, मधल्या फळीतील फलंदाज तो मोडू शकणार नाहीत. आमच्याकडे बाबर आझम आहे, तो विराटचा हा रेकॉर्ड मोडू शकतो. कारण बाबर टॉप-3 मध्ये खेळतो. त्याच्यात विराट सारखे गुण आहेत. बाबर आझम नंतर गिल हा रेकॉर्ड मोडण्यात पात्र आहे.

विराट कोहलीने सचिनला मागे टाकले

वानखेडेमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला होता. त्यानंतर कोहलीने सचिनसमोर नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार केला. सचिननेही टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्याचवेळी स्टँडवर बसलेल्या सर्व प्रेक्षकांनीही टाळ्या वाजवून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले.

‘त्याने मला एकदाही फोन केला नाही’.. Mohammed Shami ची प्रगती पाहून बायको नाराज. म्हणाली तो एक…

विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या

उल्लेखनीय आहे की कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. यादरम्यान 9 चौकार आणि 2 षटकार मारले. टीम साऊदीच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी कोहलीने 103 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली होती. विराटने या स्पर्धेत आतापर्यंत 10 सामन्यांमध्ये 3 शतके आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 711 धावा केल्या आहेत.