Join Our WhatsApp Group

IND vs PAK : भारतातील मुस्लिम पाकिस्तानला सपोर्ट करतात. पाकिस्तानी क्रिकेटर ने केले वादग्रस्त विधान.

IND vs PAK

IND vs PAK : एकदिवसीय विश्वचषक 2023 भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. दोन्ही संघात चुरशीचा सामना 15 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपल्याला पाहता येणार आहे. बऱ्याच दिवसांनी पाकिस्तान भारतीय संघाविरुद्ध भारतात सामना खेळणार आहे, मात्र त्याआधीच या सामन्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भारताने आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही आणि पाकिस्तानवर 7-0 ने आघाडी घेतली आहे. मॅन इन ब्लू पाकिस्तानविरुद्ध हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यास अजून तीन महिने बाकी आहेत, मात्र त्याआधी पाकिस्तानचा माजी खेळाडू राणा नावेद-उल-हसन याने वादग्रस्त विधान केले आहे.

IND vs PAK rana naved statement

शतक ठोकताच यशस्वी जैस्वालने मैदानावर दिल्या शिव्या ? व्हायरल होत आहे व्हिडिओ

IND vs PAK भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतात

नादिर अली पॉडकास्टवर बोलताना नावेद म्हणाला की, यावेळी एकदिवसीय विश्वचषक भारतात होणार आहे आणि त्यांच्याच मातीवर खेळणारा संघ यावेळी सर्वांचा आवडीचा असेल. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल बोलताना नावेद म्हणाला कि, भारत जेव्हा आपल्या भूमीवर खेळत असतो तेव्हा तो भारतीय क्रिकेट प्रेमींच्या आवडीचा असतो, पण पाकिस्तानचा संघही खूप चांगला आहे.

भारत पाकिस्तान सामन्यात प्रेक्षकांची खूप गर्दी असते आणि मला माहित आहे कि तिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे. आम्हाला त्यांचा पाठिंबा नेहमीच मिळतो आणि यावेळी देखील मिळेल. अर्थात भारतीय मुस्लिमांचा आम्हाला खूप पाठिंबा आहे.

नावेद पुढे म्हणाला की, जेव्हा आम्ही भारतात ICS (इंडियन क्रिकेट लीग) खेळत होतो. इंजीभाई (इंझमाम-उल-हक) कर्णधार होता. इंडियन क्रिकेट लीग सुरू झाली होती आणि त्यात आम्हाला खूप पाठिंबा मिळाला. आम्ही जगातील सर्व संघांविरुद्ध खेळलो, पण तिथल्या प्रेक्षकांनी आम्हाला साथ दिली.

एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानचा संघ 6 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. यानंतर 12 ऑक्टोबरला पाकिस्तानचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. 20 ऑक्टोबरला पाकिस्तानला कांगारू संघाविरुद्ध खेळायचे आहे, त्यानंतर 23 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळायचा आहे. त्यानंतर पाकिस्तानला दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सामने खेळायचे आहेत.