Join Our WhatsApp Group

आयर्लंड दौऱ्यासाठी 17 भारतीय खेळाडूंची निवड, हार्दिक पंड्याच्या जागी या खेळाडूला कर्णधार बनवणार.

IND vs Ireland

IND vs Ireland : वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला आयर्लंडचा दौरा करायचा आहे. 3 टी-20 सामने यावेळी दोन्ही संघात होणार आहेत. हे सामने 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी होणार आहेत. बीसीसीआय या दौऱ्यावर नवीन टीम पाठवू शकते, ज्यामध्ये कर्णधारही नवीन असेल.

होय..T20 विश्वचषक 2022 पासून सतत टी-20 फॉरमॅटचे कर्णधार असलेल्या हार्दिक पांड्याकडे दुर्लक्ष करून, या नवीन खेळाडूकडे प्रथमच कर्णधारपद सोपवले जाऊ शकते. याशिवाय आयर्लंड दौऱ्यासाठी 17 सदस्यीय टीम कशी असू शकते, त्यावर एक नजर टाकूया.

ऋषभ पंत 198 दिवसांनंतर मैदानात परतला, दुलीप ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात दाखवला अप्रतिम फिटनेस

23 वर्षीय खेळाडू होणार कर्णधार

IND vs Ireland shubman gill captain

आयर्लंडमधील 3 टी-20 मालिकेसाठी, अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती 23 वर्षीय युवा फलंदाज शुभमन गिलला कर्णधारपद देऊ शकते तर हार्दिक पांड्याला विश्रांती देऊ शकते. गिलचा भावी कर्णधार म्हणून विचार केला जात आहे, त्यामुळे त्याला छोट्या संघांविरुद्ध कर्णधार बनवून अनुभव देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मित्रांनो शुभमन गिलला मोठ्या स्तरावर कर्णधारपदाचा अनुभव नाही.

या फलंदाजांना संधी मिळू शकते

कर्णधारासोबत शुभमन गिल सलामीची जबाबदारीही सांभाळणार आहे. त्याच्यासोबत त्याच्या जोडीला सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालची निवड होऊ शकते. यानंतर ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, साई सुदर्शन, प्रभसिमरन सिंग आणि इशान किशन यांची संघात निवड होऊ शकते. या व्यतिरिक्त ऑलराऊंडर म्हणून दीपक हुडा आणि वॉशिंग्टन यांना सुद्धा संघात स्थान मिळू शकते.

या युवा गोलंदाजांना संधी

टीम इंडियाच्या युवा खेळाडूंची प्रतिभा आणि क्षमता तपासण्यासाठी आयर्लंडचा दौरा महत्त्वाचा आहे, त्यामुळे या दौऱ्यात फलंदाजांसोबत युवा गोलंदाजांनाही संधी दिली जाणार आहे. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिकसह आकाश मधवाल आणि मोहसीन खान यांना वेगवान गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते. त्याचबरोबर रवी विश्नोई आणि हरप्रीत ब्रार यांचा फिरकीपटू म्हणून संघात समावेश केला जाऊ शकतो.

आयर्लंड दौऱ्यासाठी संभाव्य भारतीय टीम

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, साई सुदर्शन, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, उमरान मलिक, मोहसीन खान, रवी विश्नोई, हरप्रीत ब्रार