Join Our WhatsApp Group

मी सचिनला महान क्रिकेटर मानत नाही. सचिनपेक्षा हा खेळाडू श्रेष्ठ. ब्रेट ली

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरने आपल्या बॅटने चमत्कार घडवताना अनेक यश संपादन केले आहेत, जे आजपर्यंत अनेक खेळाडूंना मोडता आलेले नाहीत. ऑस्ट्रेलिया संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली ने नुकतेच एक धक्कादायक विधान केले आहे. त्याने सांगितले की, तो कोणत्या खेळाडूला महान क्रिकेटर आणि महान फलंदाज मानतो.

ब्रेट लीने सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांसारख्या खेळाडूंसोबत क्रिकेट खेळले आहे. यामुळेच तो अशा फलंदाजांची चर्चा करत आहे, ज्यांनी प्रत्येक गोलंदाजाला खूप त्रास दिला आहे.

सौरव गांगुलीच्या मुलीसमोर सारा तेंडुलकर सुद्धा फिकी पडते, तिचा हॉटनेस पाहून लोक वेडे होतात.

या खेळाडूला म्हटले महान क्रिकेटपटू

jack kallis with brett lee

जिओसिनेमावरील एका मुलाखतीदरम्यान जेव्हा ब्रेट लीला विचारण्यात आले की तो जगातील महान क्रिकेटपटू कोणाला मानतो, तेव्हा त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचे नाव घेतले आणि पुढे म्हणाला कि ,

“तो ऑलराऊंडर म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी ठरला आहे. ऑलराऊंडर म्हणजे काय हे त्याच्याकडून पाहून कळते. महान क्रिकेटपटू मध्ये तो माझ्या दृष्टीत एक नंबरला आहे. जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा गोलंदाजांना ठोकल्या शिवाय राहत नाही. खेळायला यायच्या आधीच त्याच्या मनात गोलंदाजाला मात द्यायची हे ठरलेले असते.

तेंडुलकरला दिली ही पदवी

सचिन तेंडुलकरबद्दल अधिक चर्चा करताना, ब्रेट लीने त्याचे वर्णन जगातील महान फलंदाज म्हणून केले आहे आणि म्हटले आहे की “त्याला जगातील सर्वात आव्हानात्मक फलंदाज देखील म्हटले जाऊ शकते”. याबाबत अधिक चर्चा करताना ब्रेट ली म्हणाला की

जगात बरेच बॅट्समन आहेत पण तांत्रिक गोष्टी लक्षात घेऊन आपण जर बोललो तर सचिन तेंडुलकरचे नाव एक नंबरला येते असे मला वाटते. सर्वात टफ बॅट्समन कोण आहे याची जेव्हा विचारणा झाली तेव्हा ब्रेट ली ने ब्रायन लाराचे नाव घेतले.