Join Our WhatsApp Group

World Cup आधीच या स्टार खेळाडूने क्रिकेटमधून घेतली निवृत्ती. क्रिकेट विश्वात उडाली खळबळ.

World Cup

World Cup : श्रीलंका संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. हा निर्णय त्याने श्रीलंकन क्रिकेट बोर्डालाही सांगितला आहे. वानिंदू हसरंगा म्हणतो की त्याला एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.

त्यामुळे कामाचा ताण कमी करण्यासाठी तो क्रिकेटमधील सर्वात मोठा फॉरमॅट सोडत आहे. यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सीईओ ऍशले डी सिल्वा यांनी हसरंगाचा निर्णय आम्ही मान्य करू असे म्हटले आहे. व्हाईट बॉल क्रिकेट मध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावावी अशी आमची अपेक्षा आहे.

अजित अगरकरला T20 वर्ल्डकपसाठी कर्णधार सापडला, Hardik Pandya ला लवकरच हाकलून देणार.

श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत फक्त चार कसोटी सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 100.75 च्या सरासरीने 4 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या चारही विकेट एकाच डावात आल्या. त्याच वेळी, कसोटी फलंदाजीमध्ये, त्याने 28.00 च्या सरासरीने 196 धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 59 आहे.

हसरंगाची एकदिवसीय कारकीर्द

वानिंदू हसरंगाच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, 26 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने 48 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 28.78 च्या सरासरीने 67 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचवेळी, एक फलंदाज म्हणून, त्याने वनडेमध्ये 23.77 च्या सरासरीने आणि 110.20 च्या स्ट्राइक रेटने 832 धावा केल्या आहेत. वनडेमध्‍ये त्‍याची सर्वोत्‍तम 80 धावा आहेत.

T20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द

हे 3 Cricketers एक नंबरचे नशेडी आणि लफडीबाज आहेत. एकाने तर बहिणीला देखील सोडले नाही

हसरंगाने आतापर्यंत श्रीलंकेसाठी एकूण 58 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 15.80 च्या सरासरीने 91 विकेट्स घेतल्या आहेत. 9 रन्स देऊन चार विकेट हि हसरंगाची बेस्ट बॉलिंग फिगर आहे. यादरम्यान त्याने बॅटने 14.03 च्या सरासरीने आणि 123.95 च्या स्ट्राईक रेटने 533 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम फलंदाजी 71 धावा आहे.