Join Our WhatsApp Group

Babar Azam ने भगवी शाल घातली पण शाहीन आफ्रिदीने दिला नकार, हैदराबादमध्ये पाकिस्तान संघाच्या स्वागताचा व्हिडिओ व्हायरल

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट संघ काल (बुधवार, 27 सप्टेंबर) व्हिसा संबंधित गुंतागुंत संपल्यानंतर हैदराबादला पोहोचला. 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तान संघ हैदराबादमध्ये दोन सराव सामने खेळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ थेट हैदराबादला रवाना झाला, तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी विमानतळावर पाकिस्तानी संघाचे भारतीय चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केले. यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचे हॉटेलमध्ये भारतीय संस्कृतीसह भव्य स्वागत करण्यात आले. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

World Cup 2023 : 8 वर्षांनंतर परतला टीम इंडियाचा हा धाडसी खेळाडू, रोहित-विराट शिवाय भारताला चॅम्पियन बनवणार

Babar Azam ने भगवी शाल परिधान केली

जेव्हा पाकिस्तानचा संघ विमानतळावर पोहोचला तेव्हा अनेक भारतीय चाहत्यांनी क्रिकेटर्ससोबत सेल्फी काढले. तसेच सर्व खेळाडूंचे भारतीय शैलीत स्वागत करण्यात आले, यावेळी खेळाडूंचे भगव्या रंगाची शाल घालून स्वागत करण्यात आले. त्याचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरही शेअर केला होता, ज्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसह अनेक खेळाडूंचे भगवी शाल घालून स्वागत करण्यात आले होते.

सर्व खेळाडूंना वेगवेगळ्या रंगांच्या शाल भेट देण्यात आल्या असल्या तरी शाहीन आफ्रिदी मात्र शालशिवाय दिसला. या नंतर वेगवान गोलंदाजाने हे गिफ्ट स्वीकारण्यास नकार दिल्याची अटकळ बांधली जात आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तुम्ही खाली पाहू शकता.

पाकिस्तान पहिला सराव सामना शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार

बाबर आझमचा संघ उद्या (29 सप्टेंबर, शुक्रवार) न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळणार आहे. हैदराबादच्या उप्पल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. गेल्या वेळी पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक 2016 साठी भारतात आला होता. त्यानंतर पाकिस्तानचा संघ भारतात येऊ शकला नाही. यानंतर संघ ७ वर्षांनी एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होण्यासाठी भारतात पोहोचला.

14 ऑक्टोबर रोजी होणार भारत आणि पाकिस्तान यांच्यात हाय व्होल्टेज सामना

विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पाकिस्तानचा पहिला सामना ६ ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या हाय व्होल्टेज सामन्याची मी आतुरतेने वाट पाहत असल्याचे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सांगितले.

Mumbai Indians ला भेटला नवा कर्णधार, रोहित शर्माला डच्चू देणार. या ४ खेळाडूंना रिलीज करणार

बघा व्हिडीओ

विश्वचषकासाठी पाकिस्तान क्रिकेट संघ

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, साद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसीम.