Join Our WhatsApp Group

Asia Cup 2023 पूर्व पाकिस्तानच्या कर्णधाराला अटक, 3 वर्षांची शिक्षा

Asia Cup 2023 : आशिया चषक 2023 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. यावेळी पाकिस्तान आणि श्रीलंका आशिया चषक 2023 एकत्र आयोजित करत आहेत. या स्पर्धेत एकूण 6 देश सहभागी होणार आहेत. पण 2023 च्या या मोठ्या स्पर्धेपूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधाराला मोठा झटका बसला आहे.

इस्लामाबाद कोर्टाने या दिग्गज खेळाडूला 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही बातमी येताच पाकिस्तान क्रिकेट संघात गोंधळ उडाला आहे. आता आशिया चषक 2023 सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघावर संकटांचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचा : Asia Cup 2023 : रोहित-विराट-हार्दिक बाहेर. अजित आगरकरने निवडला कमकुवत संघ, हा फ्लॉप खेळाडू कर्णधार

Asia Cup 2023 आधी कॅप्टनला अटक

आम्ही बोलत आहोत पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याबद्दल, ज्यांना इस्लामाबाद ट्रायल कोर्टाने आशिया कप 2023 पूर्वी 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जशी इम्रान खानने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यानंतर त्यांनी राजकारणात एंट्री मारली.

मात्र आता न्यायालयाने त्यांना 3 वर्षांसाठी निवडणुकीत भाग घेण्यासही मनाई केली आहे. इम्रान खानवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याशिवाय त्याच्यावर एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वीही झाली होती अटक

हे वाचा : KL Rahul ने जाहीर केली निवृत्ती, या खेळाडूमुळे टीम इंडियात परतायचे नाही, परदेशात या लीगमध्ये खेळताना दिसणार

इम्रान खानला तुरुंगात जावे लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांना मे 2023 मध्ये तुरुंगात जावे लागले होते. माजी कर्णधाराला भ्रष्टाचार आणि भ्रष्ट व्यवहारांसाठी राष्ट्रीय उत्तरदायित्व अध्यादेशांतर्गत तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने इम्रान खानची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता कोर्टाने त्याला पुन्हा एकदा 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

इम्रान खानची क्रिकेट कारकीर्द

इम्रान खान हा पाकिस्तानच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 चा विश्वचषक जिंकला होता. त्याने पाकिस्तानसाठी 88 कसोटी सामन्यांमध्ये 3807 धावा आणि 362 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी, 175 वनडेमध्ये माजी कर्णधाराने 3709 धावा करत 182 फलंदाजांना आपला बळी बनवले आहे.