Join Our WhatsApp Group

याला माझ्यामुळे भारतीय टीमचा कॅप्टन करण्यात आले, नाहीतर हा…

Dhoni Appointed As Captain

Dhoni Appointed As Captain : मित्रांनो इंडियन टीम ने अखेरची ICC ट्रॉफी 2013 साली जिंकली होती हे क्रिकेट प्रेमींना वेगळं सांगायची गरज नाही. भारतीय संघ जवळपास दहा वर्षांपासून याची वाट बघत आहे. धोनीने 2013 मध्ये संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती.

यानंतर संघाने चार आयसीसी फायनल गमावल्या आहेत. तसेच अनेक वेळा उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2023 जून महिन्याच्या सुरुवातीला WTC च्या अंतिम फेरीतही भारत ऑस्ट्रेलिया समोर पराभूत झाला होता.

माजी निवडकर्ता भूपिंदर सिंग यांनी खुलासा केला

CSK ने IPL 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर चाहते धोनीकडे निवृत्ती परत घेण्याची विनंती करत आहेत. धोनीने पुन्हा एकदा भारतीय संघाचा कर्णधार बनून आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची भूमिका बजावावी, असे चाहत्यांचे म्हणणे आहे. तीन व्हाईट-बॉल आयसीसी स्पर्धा जिंकणारा एकमेव भारतीय कर्णधार असलेल्या धोनीसारखा कर्णधार भारताला मिळालेला नाही.

भारताकडून संधी न मिळाल्यामुळे आता हा खेळाडू नेदरलँडकडून 2023 वर्ल्ड कप खेळणार.

कर्णधार म्हणून रोहितच्या भविष्याविषयी चर्चा असताना, भारताचे माजी निवडकर्ता भूपिंदर सिंग यांनी BCCI ने धोनीला कर्णधार म्हणून का नियुक्त केले यामागील कारण उघड केले आहे.

why Dhoni Appointed As Captain

एका मुलाखतीत भूपिंदर म्हणाले संघात आपोआप निवड होण्याव्यतिरिक्त, तुम्ही खेळाडूचे क्रिकेट कौशल्य, देहबोली, आघाडीचे नेतृत्व करण्याची क्षमता आणि व्यवस्थापन कौशल्ये पाहता. धोनीचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, देहबोली, तो इतरांशी कसा बोलतो यासारखे पैलू आम्ही पाहिले. आम्हाला त्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

यानंतर त्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आयपीएलदरम्यानही धोनी तरुण खेळाडूंना अधिकाधिक संधी देताना दिसत आहे. त्याचा खेळाडूंशी वारंवार होणारा संवाद हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. इंडियन टीम पुढच्याच महिन्यात वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. तिथे दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच T-20 मॅच होणार आहेत.