Join Our WhatsApp Group

Virat Kohli ने शतक न झळकावता सचिन तेंडुलकरला मागे टाकले, या बाबतीत बनला नंबर-1

Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली दिवसेंदिवस मोठे विक्रम मोडत आला आहे. त्यानंतर त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी होऊ लागली. वानखेडेवर झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने 94 चेंडूत 88 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने विशेष कामगिरी केली. विराटने सचिनला मागे टाकत हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

Virat Kohli ने सचिन तेंडुलकरला मागे टाकले

6,6,6,6,6,6…Sheryas Iyer ने केले लंका दहन…तुफानी खेळी करत ग्लेन मॅक्सवेलला टाकले मागे.

विराट कोहलीने भारत आणि श्रीलंका यांच्यात (IND vs SL 2023) झालेल्या सामन्यात एक विशेष कामगिरी केली. विराटने या सामन्यात 88 धावांची इनिंग खेळली. यासह त्याने आठव्यांदा एका कॅलेंडरमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या.

या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने एका कॅलेंडर वर्षात ७ वेळा वनडेमध्ये हजार धावा पूर्ण केल्या. या गोष्टीत तो मास्टर ब्लास्टच्या पुढे गेला आहे.

सचिनने 1994, 1996, 1997, 1998, 2000, 2003 आणि 2007 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये एक हजाराहून अधिक धावा केल्या होत्या, तर कोहलीने 2011, 2012, 2014, 2017, 2018, 2019 आणि आता 2023मध्ये वनडेमध्ये 1000 हजार धावा केल्या आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये अजून 2 सामने खेळायचे आहेत. त्यामुळे कोहलीचा हा आकडा अजून वाढू शकतो.

विराट कोहलीच्या गुरुमंत्राने Mohammed Siraj ने 1 ओव्हरमध्ये घेतले 2 विकेट, VIDEO झाला व्हायरल.

एकदिवसीय विश्वचषकातील सर्वोच्च 50+ धावा

विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहलीने रोहित शर्मा, कुमार संगकारा आणि शाकिब अल हसन यांना मागे टाकले आहे. या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सचिन 21 अर्धशतकांसह पहिल्या स्थानावर आहे. कोहलीने 33 डावात 13 अर्धशतके झळकावली आहेत.

21– सचिन तेंडुलकर (44 डाव)
13– विराट कोहली (33 डाव)
12– कुमार संगकारा (35 डाव)
12– शकिब अल हसन (35 डाव)
12– रोहित शर्मा (24 डाव)