Join Our WhatsApp Group

Virat Kohli ने बॅटला हात न लावताच इतिहास रचला. या बाबतीत सचिन-कपिल आणि कुंबळेला मागे टाकले

Virat Kohli : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे तगड्या विक्रमांशी घट्ट नाते आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2023 च्या विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात प्रवेश करताच विराट कोहलीने असे काही केले कि अनिल कुंबळे, सचिन तेंडुलकर, कपिल देव यांच्यासारख्या दिग्गजांना विराटने मागे टाकले आहे.

Virat Kohli च्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला

हार्दिक पंड्याची जागा घेणार हा 21 वर्षीय खेळाडू. एशियन गेम्स मध्ये घालतोय धुमाकूळ

ऑस्ट्रेलियाच्या डावातील तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहलीने स्लिपमध्ये डावीकडे डायव्हिंग करत मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या झेलसह विराट कोहली विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक कॅच पकडणारा नॉन-विकेटकीपर बनला. विश्वचषक कारकिर्दीतील २७व्या सामन्यातील कोहलीचा हा 15वा झेल होता. जो कोणत्याही नॉन-विकेटकीपर भारतीय खेळाडूंपेक्षा जास्त आहे.

कुंबळेचा विक्रम मोडला

मिचेल मार्शचा झेल घेऊन विराट कोहलीने भारतासाठी विश्वचषकातील सामन्यांमध्ये नॉन-विकेटकीपरने सर्वाधिक झेल घेण्याचा अनिल कुंबळेचा विक्रम मोडला. कुंबळेने 18 सामन्यात 14 झेल घेतले. कपिल देवने 26 सामन्यात 12 झेल घेतले आहेत, तर सचिन तेंडुलकरने 45 सामन्यात 12 झेल घेतले आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी 17 सामन्यात 7 झेल घेतले आहेत.

306 आंतरराष्ट्रीय झेल

Asian Games 2023 : रोजंदारी मजुर ते आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्यापर्यंतच्या या तरुणाच्या संघर्षाची कहाणी प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देईल.

मिचेल मार्शचा झेल हा विराट कोहलीचा एकदिवसीय कारकिर्दीतील 146वा आणि तिन्ही फॉरमॅटमधील 306वा झेल होता. कोहलीने 111 कसोटींमध्ये 110 झेल, 282 एकदिवसीय सामन्यांमध्ये 146 झेल आणि 115 टी-20 सामन्यांमध्ये 50 झेल घेतले आहेत.

भारताकडून विकेटकीपर नसलेल्या व्यक्तीकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राहुल द्रविडच्या नावावर आहे. राहुलने 164 कसोटीत 210 झेल आणि 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 196 झेल घेतले आहेत. त्याच्या नावावर एकूण 406 आंतरराष्ट्रीय झेल आहेत.