Join Our WhatsApp Group

भारताच्या या मोठ्या खेळाडूने Rishabh Pant ची केली करोडो रुपयांची फसवणूक, त्याला सपोर्ट करणाऱ्या कर्णधाराच्या घरी पोलिसांनी पकडले!

Rishabh Pant : टीम इंडियाचा दमदार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका भीषण रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर पूर्णपणे बरा होऊन मैदानात परतण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ऋषभ पंतची करोडोंची फसवणूक करणाऱ्या क्रिकेटपटूला पोलिसांनी अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने केवळ ऋषभ पंतच नव्हे तर कॅब ड्रायव्हर, अनेक मुली, बार, रेस्टॉरंट आणि अनेक पंचतारांकित हॉटेल्सची फसवणूक केल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही तुम्हाला या प्रकरणाची संपूर्ण माहिती देऊ.

‘तो धुळी समान देखील नाही..’पाकिस्तानी दिग्गजाने Virat Kohli चा केला अपमान, बाबरशी तुलना करताना म्हणाला…

हरियाणासाठी क्रिकेट खेळला आहे

स्वतःला आयपीएल क्रिकेटर म्हणवणारा मृणांक सिंग याआधी हरियाणाकडून अंडर-19 क्रिकेट खेळला आहे. पण आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याने फसवणुकीचा मार्ग स्वीकारला. आतापर्यंत त्याने अनेक आलिशान हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची फसवणूक केली आहे.

image 9

मृणांक जिथे जिथे गेला तिथे त्याने स्वतःला आयपीएल क्रिकेटर म्हणून सादर केले. तो 2014 ते 2018 या कालावधीत मुंबई इंडियन्सकडून खेळल्याचे तो सर्वांना सांगत असे. आरोपी स्वत:ला लोकप्रिय करण्यासाठी हा दावा करत असे. जेणेकरून तो महिलांना प्रभावित करू शकेल आणि बिल न भरता महागड्या रेस्टॉरंटमध्ये जेवण आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्यासाठी मदत मिळवू शकेल.

ऋषभ पंतची 1.63 कोटी रुपयांची फसवणूक

मृणाक सिंग श्रीमंत लोकांना लक्झरी घड्याळे आणि मोबाईल स्वस्त दरात मिळवून देण्याचे खोटे आश्वासन देत असे आणि नंतर त्यांची फसवणूक करायचा. ऋषभ पंतही या फसवणुकीचा बळी ठरला.

नाकातून पाण्यासारखे रक्त वाहत होते, पाय थरथरत होते, वकार युनूस घाबरवत होता, तरीही 16 वर्षाचा Sachin Tendulkar म्हणाला- मी खेळणार.

असे सांगितले जात आहे की पंत देखील आरोपीच्या जाळ्यात आला आणि फेब्रुवारी 2021 मध्ये त्याने दोन महागड्या घड्याळांसाठी सुमारे 1.63 कोटी रुपये दिले. याप्रकरणी पंत आणि त्यांचे व्यवस्थापक पुनीत सोळंकी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

याशिवाय मृणांकने दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलसोबत 5.53 रुपयांची फसवणूक केली आहे. 2022 मध्ये हा ठग दिल्लीतील आलिशान हॉटेलमध्ये आठवडाभर राहिला होता. मात्र त्याने बिल न भरता हॉटेलमधून चेक आऊट केले आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना आपण क्रिकेटर असून बिल खासगी कंपनी देणार असल्याचे सांगितले. मात्र बिल भरले नाही.