Join Our WhatsApp Group

Sachin Tendulkar एमएस धोनीपेक्षा मोठा नाही’, या भारतीय वेगवान गोलंदाजाने विचित्र विधान करून खळबळ उडवून दिली आहे.

Sachin Tendulkar : भारतामध्ये क्रिकेट खेळणारा प्रत्येक व्यक्ती महान कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावाने परिचित असेल. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 3 आयसीसी ट्रॉफी जिंकल्या आहेत. तो भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो.

माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे, परंतु त्याने लोकांच्या मनात निर्माण केलेल्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रतिष्ठेमुळे आजही त्याचा खूप आदर केला जातो. धोनीसोबत खेळलेले क्रिकेटपटू त्याची स्तुती करण्याची एकही संधी सोडत नाहीत, मात्र याच क्रमात माहीच्या एका जुन्या मित्राने असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, यशस्वी-तिलकला संधी, तर अर्शदीप-चहल बाहेर.

या खेळाडूने Sachin Tendulkar बद्दल केले वादग्रस्त विधान

टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्जकडून एकत्र खेळणारा महेंद्रसिंग धोनी आणि वेगवान गोलंदाज मोहित शर्मा यांच्यात चांगला संबंध आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली मोहितला 2015 च्या विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. मोहित चेंडू स्विंग करण्यात पटाईत होता आणि तो धोनीचा पहिला पसंतीचा स्विंग गोलंदाज होता.

अशा परिस्थितीत साहजिकच दोघांची मैदानात आणि मैदानाबाहेरही बरीच केमिस्ट्री होती. मात्र दरम्यान, मोहित शर्माने धोनी आणि सचिन तेंडुलकरची तुलना करताना असे विधान केले आहे, ज्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठा गोंधळ उडू शकतो.

मोहित शर्माने वादग्रस्त विधान केले आहे

द इंडियन एक्स्प्रेसशी खास संवाद साधताना मोहित शर्माने महेंद्रसिंग धोनी सोबतच्या अलीकडच्या संभाषणाबद्दल सांगितले. मोहित म्हणाला कि , “मी गेल्या आठवड्यातच माही माही भाईशी बोललो. आम्हा दोघांनाही शूज आवडतात आणि जेव्हाही आम्ही बोलतो तेव्हा शूजची चर्चा नक्कीच होते.

माझा एक मित्र फॉर्मल शूज बनवण्याचे काम करतो, म्हणून माही भाईने मला त्यांच्या शूजचा फोटो पाठवला आणि मला सांगितले की मला फॉर्मल शूजसाठी अशी डिझाईन हवी आहे.”

नेपाळी पत्रकाराने इंग्रजीत प्रश्न विचारल्यावर Babar Azam गडबडला. झाला जाहीर अपमान

धोनीचा तरुणाईवर असलेला प्रभाव बघून मोहित पुढे म्हणाला, “माही भाईने ज्या प्रकारे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि त्याने क्रिकेटमध्ये जे काही साध्य केले आहे, तेव्हा आपण धोनीला भेटतो तेव्हा तसंच वाटतं जेव्हा सचिन पाजींना भेटल्यावर वाटत. सामन्यानंतर खेळाडू त्यांच्याशी कसे बोलायला जातात ते तुम्ही बघता.”

मोहित शर्मा पुढे म्हणाला, “माही भाई जिथे जिथे जातो तिथे तो खूप प्रभाव टाकतो. हे इतके चांगले आहे की तुम्ही त्यांच्या आजूबाजूला असलात तरी तुम्हाला जास्त बोलण्याची गरज नाही. तो ज्या प्रकारे तर्कशुद्धपणे सर्व काही समजावून सांगतो त्यामुळे तुम्हाला सतत त्याचे ऐकत बसावेसे वाटते.”