Join Our WhatsApp Group

‘Mitchell Marsh ने लाज सोडली…’ विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवत केला ट्रॉफीचा अपमान.

Mitchell Marsh : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये खराब सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियन संघाने चांगली गती पकडली आणि उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

यानंतर भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सची अप्रतिम कॅप्टनशिप आणि ट्रॅव्हिस हेडच्या शतकी खेळीमुळे भारताला 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

Babar Azam ने भारताच्या जखमेवर मीठ चोळले. विराट कोहलीला दाखवला आरसा.

IND vs AUS या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 240 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात कांगारू संघाने अवघ्या 43 षटकांत लक्ष्य गाठले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. या विजयानंतरही ऑस्ट्रेलियन संघ सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे.

Mitchell Marsh ने ट्रॉफीचा केला अनादर

खरं तर, विश्वचषक 2023 चे विजेतेपद जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये मिचेल मार्श हॉटेलच्या खोलीत ट्रॉफीवर पाय ठेवलेला दिसत आहे.

व्हायरल झालेल्या चित्रात मिचेल मार्श खुर्चीवर बसून आराम करताना आणि पेय पिताना दिसत आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोनंतर चाहते प्रचंड संतापले असून ते मिशेल मार्शला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करत आहेत.

World Cup Final : शेवटच्या 40 षटकात फक्त 4 चौकार, 18 अतिरिक्त धावाही दिल्या, भारताच्या पराभवाची 5 कारणे

कांगारू संघाने सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकला होता. त्याच वेळी, 20 वर्षांनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषक अंतिम सामना खेळला गेला, परंतु यावेळी देखील भारताच्या पदरी निराशाच आली.