Join Our WhatsApp Group

IND Vs ENG : पुजारा कर्णधार, पंत उपकर्णधार, सर्फराज-उमेशला संधी, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

IND Vs ENG : भारतीय क्रिकेट संघाला 2024 मध्ये इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. ही कसोटी मालिका 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम सामन्यासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

चेतेश्वर पुजारा कर्णधार होऊ शकतो

Champions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा. कोहली कर्णधार. या 15 खेळाडूंना पाकिस्तानात पाठवले जाणार.

चेतेश्वर पुजारा सध्या भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे पण इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. रोहित शर्मा या कसोटी मालिकेत खेळणार की नाही, याबाबतचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.

रोहित शर्माने या मालिकेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतल्यास चेतेश्वर पुजाराकडे संघाची कमान सोपवली जाऊ शकते. या मालिकेतून ऋषभ पंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. जर पंच परतला तर त्याला संघाचा उपकर्णधार बनवले जाऊ शकते.

या फलंदाजांना संधी मिळू शकते

इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत सर्फराज खानला टीम इंडियात संधी दिली जाऊ शकते. या मधल्या फळीतील फलंदाजाने गेल्या 3 वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत. त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारत अ संघासोबत पाठवण्यात आले आहे.

IND vs PAK : पुन्हा एकदा भारत पाक भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठे खेळला जाणार सामना.

यासोबतच शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांना फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. राहुल दुसऱ्या विकेटकीपरची भूमिका बजावू शकतो. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्या रूपाने दोन अष्टपैलू खेळाडूंना संधी मिळू शकते.

या गोलंदाजांना संधी मिळू शकते

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये एका स्पेशालिस्ट फिरकीपटू आणि चार वेगवान गोलंदाजांना संधी दिली जाऊ शकते. उमेश यादवचे संघात पुनरागमन होऊ शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 पासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी यांना संधी दिली जाऊ शकते.

IND Vs ENG : टीम इंडिया संभाव्य 15 सदस्यीय संघ

चेतेश्वर पुजारा (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सरफराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी.