Join Our WhatsApp Group

अजित आगरकरने Hardik Pandya च्या जागी 3 मोठी नावे निवडली , द्रविड या खेळाडूला 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये संधी देणार.

Hardik Pandya : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला चौकार रोखण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाला दुखापत झाली. आता त्याच्या दुखापतीबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.

दुखापतीनंतर तो घाईघाईने हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आता या स्थितीत त्याला मैदानात परतणे अवघड दिसत आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याऐवजी 3 खेळाडूंची निवड करू शकतात.

विजय शंकर

हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून समोर येतंय ते नाव म्हणजे विजय शंकर. हार्दिकप्रमाणेच 2019 चा विश्वचषक खेळलेला विजय शंकर स्फोटक फलंदाजीसह वेगवान आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.

आयपीएल 2023 मध्ये त्याची कामगिरी चांगली होती. विजय शंकरने भारतीय संघासाठी 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने 223 धावा केल्या आहेत आणि 4 बळी घेतले आहेत. शंकर खालच्या क्रमवारीत भारतासाठी उत्कृष्ट फिनिशर ठरू शकतो.

शिवम दुबे

हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून चर्चेत असलेले दुसरे नाव शिवम दुबे. डावखुरा फलंदाज दुबे लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच तो वेगवान आणि मध्यमगती गोलंदाजी करतो. या खेळाडूने भारतासाठी 1 वनडे आणि 18 टी-20 सामने खेळले आहेत. आयपीएल 2023 मध्ये सीएसकेला चॅम्पियन बनवण्यात त्याचे मोठे योगदान होते.

वॉशिंग्टन सुंदर

हार्दिक पंड्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला 2023 च्या विश्वचषक संघातही स्थान मिळू शकते. अक्षर पटेल दुखापतीमुळे संघाबाहेर असतानाही सुंदर हा संघात निवडीचा दावेदार होता मात्र अखेरच्या क्षणी आर अश्विनला संधी देण्यात आली.

सुंदर हा डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चेंडूने चांगली कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टनने 18 एकदिवसीय सामन्यांमध्ये 251 धावा केल्या आणि 16 विकेट्स घेतल्या.