Join Our WhatsApp Group

Glenn Maxwell लाईव्ह मॅच दरम्यान धूम्रपान करताना कॅमेरात कैद, व्हिडिओ झाला व्हायरल

Glenn Maxwell : भारतात होणाऱ्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 10 सामने पूर्ण झाल्यानंतर सर्व संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. 10 वा सामना काल म्हणजेच 12 ऑक्टोबर 2023 रोजी लखनौ, उत्तर प्रदेश येथे खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका
(AUS vs SA) संघांमध्ये झाला.

मात्र, या सामन्यात ऑस्ट्रेलियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण, याचदरम्यान ग्लेन मॅक्सवेलचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ग्लेन मॅक्सवेल असे काम करत आहे ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

दारूच्या नशेत Chris Gayle ने निर्लज्जपणाचा कळस केला. अनोळखी तरुणीसोबत केले लज्जास्पद कृत्य. व्हिडीओ व्हायरल

Glenn Maxwell चा व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा विश्वचषकातील स्टार अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या एका चुकीने संपूर्ण संघालाच लाजवले. वास्तविक, लाइव्ह मॅचमध्ये तो सिगारेट ओढताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, लोक हा व्हिडीओ शेअरही करत आहेत.

तथापि, ऑस्ट्रेलियन ड्रेसिंग रूमच्या पॅव्हेलियनमध्ये बसून ग्लेन मॅक्सवेल नक्की सिगारेटच ओढत आहे का ? हे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत नाही. मात्र प्रत्येक क्रिकेट चाहता त्याचा हा व्हिडिओ ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. सिगारेट ओढणाऱ्या या खेळाडूने सामन्यात विशेष काही केले नाही आणि महत्त्वाच्या सामन्यात तो 17 चेंडूत केवळ 3 धावा करून बाद झाला.

सामन्याची स्थिती

उल्लेखनीय आहे की काल (12 ऑक्टोबर 2023) दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार कमिंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचा त्यांच्या संघावर विपरीत परिणाम झाला.

6 6 6 6 4 4 4 4 2 2 1 दिल्लीत Rohit Sharma नावाचं तुफान वादळ. भारताने अवघ्या 35 षटकांत 8 विकेट्स राखून विजय मिळवला.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा फडशा पाडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 7 गडी गमावून 311 धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात खूपच खराब झाली. यानंतर हळूहळू सर्व खेळाडू नांगी टाकत गेले.

46 धावा करून बाद झालेल्या लॅबुशेनने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. मात्र 41 षटकांच्या खेळात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 177 धावांवर ऑलआऊट झाला. यासह दक्षिण आफ्रिकेने सामन्यात 134 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

बघा व्हिडीओ