Join Our WhatsApp Group

ODI : सर्वात पहिली डबल सेंचुरी सचिन तेंडुलकरने नाही तर या धाडसी खेळाडूने केलाय हा पराक्रम.

ODI Double Hundred : भारताच्या महान क्रिकेटपटूंमध्ये गणला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावले होते. परंतु याच्या आधी सुद्धा याच फॉरमॅटमध्ये द्विशतक झळकावणारा खेळाडू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून सहा खेळाडूंनी द्विशतके झळकावली आहेत.

सचिन तेंडुलकरबद्दल बोलायचे झाले तर असे मानले जाते की त्याने एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावले होते, पण तसे अजिबात नाहीये. सचिनपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन हा भारताचा पहिला खेळाडू आहे.

IND vs PAK : पाकिस्तानची ठासायला अचानक भारतातून श्रीलंकेला निघाला हा घातक खेळाडू. बाबर आझमला अनेकदा चारलीये धूळ.

ODI Double Hundred पहिले कोणी केले?

ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्कने सचिनच्या शतकापूर्वी 13 वर्षे आधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले होते. बेलिंडा ही ऑस्ट्रेलियाची सर्वात धडाकेबाज महिला फलंदाजांपैकी एक आहे. बेलिंडाने 1997 मध्ये डेन्मार्कविरुद्ध हे शतक झळकावले होते.

बेलिंडाने डेन्मार्कविरुद्ध 219 धावांची इनिंग खेळून ही कामगिरी केली होती. त्याच्यानंतर 2010 साली सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक झळकावून पुरुष क्रिकेटमध्ये ही मोठी कामगिरी केली.

बेलिंडाची क्रिकेट कारकीर्द

ऑस्ट्रेलियाच्या महान महिला खेळाडूंपैकी एक असलेल्या बेलिंडा क्लार्कने संघासाठी 15 कसोटी, 118 एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 5767 धावा होत्या. 2005 मध्ये बेलिंडाने क्रिकेटला अलविदा केला होता.

भारतीय द्विशतक ठोकणारे खेळाडू

World Cup 2023 : ज्या खेळाडूवर घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचा गुन्हा आहे, त्याला 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये मिळाली आहे एंट्री.

गेल्या काही वर्षांत भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र 2011 पासून भारताला एकही एकदिवसीय विश्वचषक जिंकता आलेला नाही. भारतीय क्रिकेटमध्ये असे सहा फलंदाज आहेत ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकले आहे. तीन वेळा द्विशतक झळकावणारा एकच खेळाडू आहे.

सचिन तेंडुलकर (2010) – 200 नाबाद विरुद्ध दक्षिण आफ्रिका
वीरेंद्र सेहवाग (2011)- 219 वि. वेस्ट इंडिज
रोहित शर्मा (2013) – 209 वि. ऑस्ट्रेलिया
रोहित शर्मा (2014)- 264 वि. श्रीलंका
रोहित शर्मा (2017) – 208 नाबाद विरुद्ध श्रीलंका
इशान किशन (2022) – 210 वि. बांगलादेश
शुभमन गिल (2023) – 208 वि. न्यूझीलँड